WhatsAppला मोठा झटका, अनेक कंपन्यांनी आपले Account Signal मध्ये केले Move

व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) नवीन प्रायव्हसी (Privacy Policy) धोरणाला विरोध सुरू आहे. लोकांची जबरदस्तीने वैयक्तिक माहिती घेण्याच्या नव्या निर्णयाचे व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) नाराजी वाढू लागली आहे.  

Surendra Gangan | Jan 13, 2021, 15:44 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) नवीन प्रायव्हसी (Privacy Policy) धोरणाला विरोध सुरू आहे. लोकांची जबरदस्तीने वैयक्तिक माहिती घेण्याच्या नव्या निर्णयाचे व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) नाराजी वाढू लागली आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की केवळ सामान्य वापरकर्तेच नाही तर मोठ मोठ्या कंपन्यांच्या सीईओ आणि बिझिनेस टायकोन्स ( Business Tycoons) यांनीही या मेसेजिंग प्लॅटफॉर्मशिवाय  (Messaging Platform) इतर अ‍ॅप्सची निवड करण्यास सुरुवात केली आहे. कोणी कोणी केले व्हॉट्सअ‍ॅपला बाय बाय...

1/5

प्राप्त माहितीनुसार पेमेंट गेटवे अ‍ॅप PhonePe सीईओसह कंपनीच्या 1000 हून अधिक कर्मचार्‍यांनी त्यांच्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप (WhatsApp) काढून टाकले आहे. आता हे कर्मचारी त्यांच्या सर्व कामांसाठी सिग्नल अॅप (Signal) वापरत आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम (PhonePe CEO Sameer Nigam) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

2/5

महिंद्रा (Mahindra) ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही व्हॉट्सअ‍ॅप सोडले आहे. ट्विटद्वारे त्याने व्हॉट्सअ‍ॅप सोडल्याची माहिती दिली आहे. आता ते सिग्नलवर आले आहेत.

3/5

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टाटा समूहाचे (Tata Group) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandraskhekhar) आता व्हॉट्सअॅपऐवजी सिग्नल वापरत आहेत. या व्यतिरिक्त कंपनीच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपही सोडले आहे.

4/5

एका रिपोर्टनुसार पेमेंट अ‍ॅप पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही आपल्या टीमच्या संवादासाठी व्हॉट्सअॅपपासून दूर राहाण्यास सांगितले आहे.

5/5

जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एलोन मस्क ( Elon Musk) यांनी अलीकडेच लोकांना आवाहन केले की, व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी धोरणामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी त्यांच्या चॅटिंगसाठी सिग्नलचा वापर करावा. या आवाहनानंतर जगभरातील लोकांनी व्हॉट्सअॅप इनस्टॉल (Uninstall) करण्यास सुरवात केली.