तुम्ही कुंकू का लावता? जेव्हा राष्ट्रपतींनी रेखाला विचारला प्रश्न; पतीने केली आत्महत्या, तर सासूने म्हटलं होतं 'चेटकीण'

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचं मूळ नाव भानुरेखा गणेशन आहे. 10 ऑक्टोबरला त्या 70 वर्षांच्या होतील. रेखा यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. रेखा नेमकं कोणाच्या नावाचं कुंकू लावतात हा तर अनेकांना प्रश्न पडलेला असतो. हा प्रश्न फक्त सर्वसामान्य नाही तर एकदा माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनीही त्यांना विचारला होता.   

Shivraj Yadav | Oct 09, 2024, 19:24 PM IST

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचं मूळ नाव भानुरेखा गणेशन आहे. 10 ऑक्टोबरला त्या 70 वर्षांच्या होतील. रेखा यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. रेखा नेमकं कोणाच्या नावाचं कुंकू लावतात हा तर अनेकांना प्रश्न पडलेला असतो. हा प्रश्न फक्त सर्वसामान्य नाही तर एकदा माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनीही त्यांना विचारला होता. 

1/8

2/8

'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं निमित्त होतं. तत्कालीन राष्ट्रपती सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करत होते. त्या वर्षी रेखा यांना 1981 च्या 'उमराव जान' या कल्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी रेखा यांना हा सन्मान दिला. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. तेव्हा राष्ट्रपतींना रेखा यांना 'तुम्ही भांगेत कुंकू का लावता?' असा प्रश्न विचारला. त्यावर रेखा यांनी उत्तर दिले होतं की, 'मी ज्या शहराची आहे, तेथे भांगेत कुंकू लावणं ही एक सामान्य गोष्ट आहे... ही एक फॅशन आहे'.  

3/8

आता यावरुनच तुम्हाला रेखा किती स्पष्टवक्त्या आहेत हे समजत असेल. रेखा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या वेदनांचा सामना केला आहे. लोकांनी त्यांच्याकडे बोटं दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अनेक अभिनेत्यांशीही त्यांचं नाव जोडले गेले.   

4/8

1990 मध्ये रेखा यांनी दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांच्या आयुष्यात आणखी एक दु:ख दार ठोठावेल हे त्यांना तेव्हा माहित नव्हतं. अवघ्या 8 महिन्यांत हे लग्न दुःखदायक अंतापर्यंत पोहोचले. रेखा यांच्या पतीने नैराश्यातून आत्महत्या केली. यानंतर सासूने त्यांना चेटकीण असंही म्हटलं.   

5/8

रेखा यांनी एका मुलाखतीत सर्व आरोपांवर मौन सोडलं होतं. रेखा म्हणाल्या होत्या की, 'मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. 1975 मध्ये मी स्वतःला सामावून घेतलं. जेव्हा चित्रपट मासिकांनी काहीही छापण्यास सुरुवात केली तेव्हा हे घडले. मग मी गप्प झाले".   

6/8

सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखा यांना विचारण्यात आलं होतं की, 'भानुरेखा'ला काय करायचं होतं? तेव्हा रेखा म्हणाल्या होत्या, 'मला अभिनेत्री अजिबात व्हायचं नव्हतं. मला लग्न करून स्थायिक व्हायचं होतं'.  

7/8

रेखा यांना अभिनयाची आवड नव्हती. पण कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांना चित्रपटांमध्ये यावं लागलं. पण आपलं काम मनापासून कसं करायचे हे त्यांना चांगलं माहित होतं. 'घर' चित्रपटात त्यांनी बलात्कार पीडितेची भूमिका अतिशय तीव्रतेने साकारली आणि तो त्यांचा आवडता चित्रपट ठरला. पण पुढे त्यांना स्वतःचा 'खून भरी मांग' जास्त आवडला.  

8/8

रेखा यांनी नागिन (1976), मुकद्दर का सिकंदर (1978), मिस्टर नटवरलाल (1979), खूबसूरत (1980), उमराव जान (1981), खून भरी मांग (1988) अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 1996 मध्ये खिलाडी का खिलाडी चित्रपटात नकारात्मक भूमिका करत त्यांनी आपण प्रत्येक भूमिकेत फिट असल्याचे सिद्ध केले.