इमरान हाश्मीसोबत इंटिमेट सीनने चर्चेत आलेली 'ही' सुंदर अभिनेत्री आहे तरी कुठे?

या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री जिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर ती इमरान हाश्मीसोबतच्या इंटिमेट सीनने प्रचंड चर्चेत आली. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Sep 01, 2024, 14:26 PM IST
1/6

मॉडेलिंगपासून सुरुवात

या अभिनेत्रीने फक्त 9 वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतली.

2/6

उदिता गोस्वामी

ही अभिनेत्री आहे उदिता गोस्वामी. उदिताची बॉलिवूडमध्ये एन्ट्री एका मासिकामुळे झाली आहे. पूजा भट्टने तिचा पहिला फोटो पाहिला आणि तिला 'पाप'साठी साइन केले. 

3/6

मोठ्या प्रमाणात कौतुक

यानंतर अभिनेत्रीने अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'जहर' आणि 'अक्सर'मध्ये काम केलं आहे. दोन्ही चित्रपटांमधील तिचा अभिनय पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता.

4/6

शेवटचा चित्रपट

या चित्रपटांनंतर उदिता ही 'अगर', 'किसे प्यार करूं', 'फॉक्स', 'अपार्टमेंट' आणि 'रोक'मध्ये दिसली. तिचा 'डायरी ऑफ़ ए बटरफ्लाई' हा शेवटचा चित्रपट होता. 

5/6

रोहित सूरीसोबत लग्न

अभिनयापासून दूर गेल्यानंतर उदिता गोस्वामीने 2013 मध्ये जहर चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित सूरीसोबत लग्न केले. 

6/6

नेहमी सक्रिय

सध्या उदिता गोस्वामी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमी तिचे वेगवेगळे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.