खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उडाली खळबळ; प्रज्ञा नागरा आहे तरी कोण?

अनेकदा सोशल मीडियावर अशी काही पोस्ट, व्हिडीओ व्हायरल होतो ज्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्ती वादात सापडतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया जी खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळे वादात अडकली.

| Dec 08, 2024, 15:09 PM IST

Who is Pragya Nagra: अनेकदा सोशल मीडियावर अशी काही पोस्ट, व्हिडीओ व्हायरल होतो ज्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्ती वादात सापडतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया जी खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळे वादात अडकली.

1/11

खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उडाली खळबळ; प्रज्ञा नागरा आहे तरी कोण?

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

Who is Pragya Nagra: अनेकदा सोशल मीडियावर अशी काही पोस्ट, व्हिडीओ व्हायरल होतो ज्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्ती वादात सापडतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया जी खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळे वादात अडकली.

2/11

सध्या वादाच्या भोवऱ्यात

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि दमदार सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या पण सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया.

3/11

खासगी व्हिडिओ व्हायरल

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो एक खासगी व्हिडिओ आहे. ज्यामुळे प्रज्ञा नागरा नावाची प्रसिद्ध अभिनेत्री वादात सापडली आहे.एक खासगी व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाल्यामुळे अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यामुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.

4/11

ट्रोलिंगचा सामना

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

या घटनेनंतर अभिनेत्री प्रज्ञाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि सोशल मीडियावर एक नोटही शेअर केली. असे असले तरी मुद्द्यावरील चर्चा काही थांबताना दिसत नाही. प्रज्ञा नागरा कोण आहे? जाणून घेऊया.

5/11

25 वर्षांची अभिनेत्री

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

प्रज्ञा नागरा ही 25 वर्षांची अभिनेत्री आहे. ती हरियाणातील अंबालातल्या एका पंजाबी कुटुंबातील आहे. प्रज्ञाचा जन्म 14 डिसेंबर 1998 रोजी अंबाला येथे झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. तिचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि काही काळ चेन्नईमध्ये तैनात होते. त्यामुळे त्यांना अनेकदा प्रवास करावा लागत होता. 

6/11

मॉडेलिंगची आवड

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

दिल्लीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्रज्ञाला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. प्रज्ञाने आतापर्यंत 100 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. प्रज्ञा नागाराने 2019 मध्ये तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली.

7/11

सैन्यात भरती व्हायचे होते

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

प्रज्ञा नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये होती आणि तिला आधी सैन्यात भरती व्हायचे होते. पण नंतर तिने अभिनयात करिअर करायचे ठरवले. तिने 2019 मध्ये 'अंजली' या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने 2022 मध्ये 'वरलारू विचारा' या तमिळ सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

8/11

3 चित्रपटांमध्ये काम

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

5 वर्षांच्या कारकिर्दीत प्रज्ञाने 3 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या चित्रपटांमध्ये 'N4' (2023) आणि 'नाधिकलील सुंदरी यमुना' (2023) या सिनेमांचा समावेश आहे.

9/11

अभिनयाचे इंडस्ट्रीमध्ये खूप कौतुक

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रज्ञा चेन्नईला गेली. 2022 मध्ये तिने जीवासोबत 'वरलारू मुक्कियम' या तमिळ चित्रपटात काम केले. तिच्या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पण तिच्या अभिनयाचे इंडस्ट्रीमध्ये खूप कौतुक झाले.

10/11

खासगी व्हिडिओ लीक प्रकरणात स्पष्टीकरण

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

प्रज्ञा टॉलिवूडमध्ये आपले करिअर करत असून भविष्यात बॉलिवूडमध्येही काम करण्याचा तिचा मानस आहे. अलीकडेच खासगी व्हिडिओ लीक प्रकरणात तिने स्पष्टीकरण दिले आहे. हे सर्व खोटे आहे आणि हे फक्त एक वाईट स्वप्न आहे, ज्यातून मी लवकरच बाहेर पडेन असे प्रज्ञा सांगते. एआयचा वापर आमच्या समस्या वाढवण्यासाठी नव्हे तर आम्हाला मदत करण्यासाठी केला पाहिजे, असे ती सांगते.

11/11

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Who is Pragya Nagra Malayalam Private Video Leak Entertainment Marathi News

तंत्रज्ञान आपल्याला मदत करण्यासाठी आहे, आपल्याला दुःखी करण्यासाठी नाही. जे एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन चुकीची माहिती पसरवतात, मला त्या लोकांची किव येते असे ती सागंते. प्रज्ञाने याप्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.