Raha Kapoor 1st Birthday : ...म्हणून रणबीर-आलियानं लपवलाय लेकीचा चेहरा; जन्मलेल्या बाळाचा चेहरा नेमका कधी दाखवायचा?
Raha Kapoor 1st Birthday : 'या' कारणामुळे लपवला आलिया-रणबीरने लेक राहाचा चेहरा, नेमका कधी दाखवायला हवा?
Alia Daughter Raha Kapoor First Birthday: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक 'राहा' चा आज पहिला वाढदिवस आहे. अद्याप राहाचा एकही फोटो सोशल मीडियावर किंवा आलिया-रणबीरने शेअर केलेला नाही. एवढंच नव्हे तर आलिया-रणबीरने पापाराझी आणि इतर फोटोग्राफर्सना देखील 'राहा' चे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली आहे.
1/10
राहा झाली वर्षाची
बी-टाऊनचे पॉवरफुल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर 6 नोव्हेंबरला एक वर्षाची झाली आहे. मात्र या जोडप्याने अद्याप तिचा चेहरा उघड केलेला नाही. आलिया अनेकदा राहासोबत स्पॉट झाली आहे. पण जेव्हा ती मीडियाला पाहते तेव्हा ती राहाचा चेहरा झाकते. त्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाली आहे. आता अलीकडेच आलियाने एका इव्हेंटमध्ये यामागचे कारण उघड केले आणि ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
2/10
आलियाने केला खुलासा
अलीकडेच, आलिया एका चॅट शोमध्ये दिसली होती, जिथे तिला विचारण्यात आले होते की ती तिच्या मुली राहाचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार आहे. तर आलिया म्हणते, “आम्हाला राहाचा चेहरा लपवायचा आहे असं अजिबातच नाही. "परंतु आम्हाला या तिच्या अपब्रिंगीगमध्ये सहभागी व्हायचं आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही नक्कीच राहाचा चेहरा सगळ्यांना दाखवू पण तोपर्यंत ही गोपनियता सांभाळणे आमच्यासाठीही आवश्यक आहे.
3/10
बाळाचे फोटो शेअर करण्याला Sharenting का म्हणतात?
Share आणि Parenting याला Sharenting असे म्हणतात. अनेक पालकांना आपल्या मुलांचे फोटो शेअर करायचे असतात. याला Sharenting असे म्हणतात. 2012 Wall Street Journal नुसार, पालकांना आपल्या मुलांनाही लोकांनी ओळखावे असे वाटते. त्यामुळे ते मुलांचे फोटो जाहीर करतात. पण काही पालकांना यापेक्षा वेगळं वाटतं. आपल्या मुलांची माहिती ही खासगी असावी असे वाटतेय
4/10
बाळाचा चेहरा का लपवतात?
अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर बाळाचा चेहरा लपवतात किंवा थेट जाहीर करत नाही. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतात. सोशल मीडियावर अनेकजण बाळाचा चेहरा ब्लर करतात किंवा ईमोजीलावून तो झाकतात. असे का करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण यामागे अनेक कारणे आहेत. काही लोकांना आपल्या खासगी आयुष्याबद्दल गोपनीयता ठेवायला आवडते. अगदी तसेच बाळाबद्दलही आहे. त्यांना आपल्या बाळाबद्दलची माहिती कुणालाही सांगायची नसते.
5/10
सोशल मीडिया मुलांसाठी सुरक्षित नाही
सोशल मीडिया सर्व मजेदार असले तरीही ते सुरक्षित नाही. सोशल मीडिया हा अतिशय सार्वजनिक प्लॅटफॉर्म आहे. यावर कुणाचेही कोणतेही निर्बंध नाहीत. अशावेळी लहान बाळांचे फोटो शेअर करणे चांगले नाही. कारण तेथे कोणतेही आणि कुणाचेही बंधन नसते. याची जबाबदारी कुणीही घेत नाही किंवा त्यासाठी कुणालाही जबाबदार ठरता येत नाही. त्यामुळे येथे बाळांचे फोटो सुरक्षित नसतात.
6/10
बाळ आणि खासगी जीवन
7/10
मुलांना लागते नजर
काही पालकांना बाळाची काळजी असते. ते अधिक सतर्क असतात. अशावेळी पालक मुलांना नजर लागू नये म्हणून त्यांचे फोटो सोशल करत नाहीत. अनेक पालकांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची अशी समज आहे की, मुलांचे फोटो किंवा त्यांच्या लिला सगळ्यांसमोर मांडल्यावर त्यांना नजर लागते. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हा दुसरा विषय आहे. पण या विचाराने देखील पालक बाळांचे फोटो शेअर करत नाही.
8/10
बाळाच्या जन्माचा खडतर प्रवास
अनेक पालकांना पालकत्व सहज मिळत नाही. त्यांना याकरता असंख्य आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अगदी उपचार करून बाळाचा जन्म होतो, अशावेळी पालक आपल्या मुलाबाबत अधिक अलर्ट असतात. ते बाळाला काही होणार नाही याची खूप काळजी घेतात. असे पालकही मुलाचा फोटो शेअर करायला घाबरतात. तसेच बाळ लहान असेपर्यंत त्याच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अशावेळी उगाचच कोणतीही रिस्क नको म्हणून फोटो शेअर करणे टाळतात.
9/10