महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ की अशुभ? याविषयी शास्त्र नेमकं काय म्हणतं?

तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून बोलताना ऐकलं असेल की डोळा फडफडणं हे काही शुभ आणि अशुभ संकेत देत असतात. अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांचं कारण न समजता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मात्र अशा सर्व गोष्टींना धर्म शास्त्रांमध्ये काहीना काही कारण असतात आणि त्यांच अर्थ समजून घेतल्यावरच त्याच्यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये हे ठरवायचे असते.   

| Nov 27, 2024, 13:56 PM IST
1/8

महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं असं शास्त्रांमध्ये लिहिलं आहे मात्र यामागची कारण देखील जाणून घेऊयात. भारतीय धर्म शास्त्रांनुसार कोणत्याही महिलेचा डावा डोळा फडफडण शुभ संकेत देतात. पण काही देशांमध्ये याला अशुभ मानलं जातं. 

2/8

असं म्हटलं जातं की, तुमच्या डोळ्यांवरील पापणी फडफडणेचा अर्थ तुमच्या घरात कोणीतरी नवा पाहुणा येणार आहे.  तर डोळ्यांखाली असलेली पापणी फडफडण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही रडणार आहात. तुमच्या डोळ्यांच्या कोपरा फडफडणे म्हणजे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहे.   

3/8

शास्त्रानुसार जेव्हा महिलांचा डाव डोळा फडफडतो तेव्हा त्याला शुभ मानलं जातं. याचा अर्थ नक्कीच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. याला सुख आणि सौभाग्याचा संकेत मानलं जातं. डावा डोळा फडफडण हे तुम्ही काहीतरी नवी सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला कपडे किंवा दागिने सारख्या नवीन गोष्टी मिळणार आहेत. तसेच डावा डोळा फडफडणे तुमच्याकडे कोणीतरी पाहुणा येणार असा देखील संकेत असतो. 

4/8

डावा डोळा फडफडणे म्हणजे तुम्ही तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा असे देखील सूचित करते. तुम्ही जर भूतकाळाबद्दल जास्त विचार करत असाल तर तो सोडून वर्तमानावर विचार करावा असा देखील त्याचा अर्थ असतो. 

5/8

ज्योतिषशास्त्रानुसार डावा डोळा फडफडणे हे तुम्ही इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याबाबत तुम्ही काळजी करणं थांबवावं असं देखील असू शकतं.  डावा डोळा फडफडण म्हणजे तुम्हाला तुमच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा संकेत आहे. तसेच हा आर्थिक लाभाचा संकेत सुद्धा असू शकतो.   

6/8

पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास उजवा डोळा फडफडण हे शुभ असतं तर डावा डोळा फडफडण हे अशुभ मानलं जातं. 

7/8

डोळा फडफडण्याच्या मागची वैज्ञानिक कारण हे वेगळी आहेत. जेव्हा तुम्ही काम्पुटरचा जास्त वेळ वापर करता तेव्हा तुमचे डोळे कोरडे पडतात आणि त्यामुळे ते डोळे मिटले जावेत म्हणून फडफडतात. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा वापरणाऱ्यांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळू शकते.डोळे फडफडण्याचे प्रमुख कारण म्हणजे डोळ्यांतील थकवा, मानसिक ताण आशु शकते. अनेक वेळा शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते आणि झोप न लागणे यामुळेही देखील डोळे मिटतात.

8/8

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)