चेहरा पाहून दरवाजा उघडणार; Xiaomi ची जबरदस्त इलेक्ट्रीक कार

 Xiaomi ची इलेक्ट्रीक कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहे.   

Nov 16, 2023, 16:09 PM IST

Xiaomi SU7 : स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये Xiaomi कंपनीचा चांगलाच दरारा आहे.  Xiaomi कंपनी आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण करणार आहे. Xiaomi कंपनीची  जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच होणार आहे. चेहरा पाहून या कारचा दरवाजा उघडणार आहे. 

1/7

बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड (BAIC) यांच्याच्या मदतीने Xiaomi SU7 कारची निर्मीती केली जाणार आहे. 

2/7

Xiaomi SU7 इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये स्मार्टफोन प्रमाणे फेस रेकग्निशन लॉक/अनलॉक सिस्टीम दिली जाऊ शकते.  

3/7

या कारमध्ये  210 किमी इतकी रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. 2024 पर्यंत ही कार मार्केटमध्ये दाखल होईल.  

4/7

 Xiaomi SU7 कार ही 4997 मिमी लांब, 1,963 मिमी रुंद आणि 1455 मिमी उंच आहे.   

5/7

 MS11 या कोडनेमने कारचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.   

6/7

टेस्ट ड्राईव्ह दरम्यान ही कार अनेकदा दिसली होती.

7/7

Xiaomi ने पहिल्या इलेक्ट्रिक कारसाठी - Xiaomi SU7 सेडानसाठी चीनमध्ये विक्री परवान्यासाठी अर्ज केले आहेत.