बनायचं होतं IAS अधिकारी पण झाली अभिनेत्री, बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या लूक आणि अभिनयामुळे चर्चेत राहतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला एकेकाळी आयएएस अधिकारी व्हायचे होते.

Soneshwar Patil | Feb 11, 2025, 14:16 PM IST
1/7

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जिला एकेकाळी IAS अधिकारी व्हायचे होते. 

2/7

परंतु, आता ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे नाव यामी गौतम आहे. यामी गौतम ही पंजाबी चित्रपट दिग्दर्शक मुकेश गौतम यांची मुलगी आहे.

3/7

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री यामी गौतमने सांगितले की, तिने आयुष्यात कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. तिला IAS अधिकारी व्हायचे होते. 

4/7

परंतु, एकदा तिला भेटण्यासाठी कुटुंबातील मित्र चंदीगडला आले आणि त्यांनी तिच्या पालकांना सांगितले की, यामीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करावा. त्यानंतर यामीने अभिनयात जाण्याचा विचार केला.

5/7

यामी गौतमने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. तिने 'चांद के पार चलो', 'ये प्यार ना होगा कम' यासारख्या मालिकांपासून सुरुवात केली. त्यानंतर 2012 मध्ये तिने आयुष्मान खुरानाच्या 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट यामीसाठी एक टर्निंग पॉईट ठरला. 

6/7

अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. यामधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये कामं केले. 

7/7

यामीने  2024 मध्ये एका मुलाला जन्म दिला. तेव्हापासून ती अभिनयापासून दूर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामी गौतमची एकूण संपत्ती ही 99 कोटी रुपये इतकी आहे.