1/3
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/01/432754-amrutayoga.jpeg)
सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर एकमेव उपाय म्हणजे योगा. योगा हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय असून मनःशुद्धीसाठीही अतिशय उत्तम औषध आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरणाऱ्या या योगाचे महत्त्व आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. या महामारीच्या काळात अनेक जण योगाभ्यास करून मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आपले सेलिब्रिटीही अपवाद नाहीत.
2/3
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/01/432753-amrutakhanvilkar.jpeg)
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकरनेही सोशल मीडियावर योगाचे फोटोज शेअर करत, आजच्या काळात योगा किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या फॉलोअर्सना योगा करण्यासाठी प्रेरित केले आहे. आपल्या या योगाभ्यासाबद्दल अमृता खानविलकर म्हणते,''सध्या आजूबाजूचे वातावरण खूपच भयंकर आहे. त्यामुळे अनेकदा नैराश्यही येते. इतकी वर्षं या क्षेत्रात असल्याने शूटिंगच्या, मीटिंग्सच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत होत्या.
3/3
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/01/432752-amruta.jpeg)