Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. अल्पवयीन मुलाच्या आईची पुन्हा चौकशी केली जातेय...चौकशीत आरोपीची आई शिवानी अग्रवाल उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातोय.
सबळ पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवानी अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आलाय.
विशाल अग्रवालला आज दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. त्याची ब्लड सॅम्पल बदलल्याच्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी केली जाईल. ड्रायव्हर अपहरण आणि धमकी प्रकरणात विशाल अग्रवालची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याला पोलीस आज पुन्हा ताब्यात घेऊन अटक करणार आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने 19 मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चोप दिला. दरम्यान घटनास्थळावरचं एक सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये कार किती वेगात होती हे स्पष्टपणे दिसत आहे.
या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर करताना निबंध लिहिण्याची अट घातल्याने संताप व्यक्त झाला होता.