1/7
![रश्मी करंदीकर
या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे, पोलीस दलातील वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक), ठाणे या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. आपल्या कामासाठी आणि धैर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रश्मी करंदीकर यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी http://girimitra.org/ या वेबसाईटवर संपर्क साधा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188289-treaaak7.jpg)
रश्मी करंदीकर या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे, पोलीस दलातील वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक), ठाणे या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. आपल्या कामासाठी आणि धैर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रश्मी करंदीकर यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी http://girimitra.org/ या वेबसाईटवर संपर्क साधा...
2/7
![सुमन कुटीयाल
सुमन कुटीयाल या मूळच्या देहरादूनच्या... माऊंट एव्हरेस्टसह त्यांनी आत्तापर्यंत १७ शिखरं यशस्वीरित्या सर केलीत. भागीरथी II, श्री कांत, केदार डोम, बांदूरपंच, सेसर कांगरी I अशा मोहिमांचाही यात समावेश आहे.
इंडो-जापनीज कांचुंनजुंगा मोहीम, माऊंट कामेत, अबी गामीन, मोमत्संग कांगरी मोहीम अशा अनेक उल्लेखनीय मोहिमांमध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवलाय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188279-treaaak6.jpg)
सुमन कुटीयाल सुमन कुटीयाल या मूळच्या देहरादूनच्या... माऊंट एव्हरेस्टसह त्यांनी आत्तापर्यंत १७ शिखरं यशस्वीरित्या सर केलीत. भागीरथी II, श्री कांत, केदार डोम, बांदूरपंच, सेसर कांगरी I अशा मोहिमांचाही यात समावेश आहे. इंडो-जापनीज कांचुंनजुंगा मोहीम, माऊंट कामेत, अबी गामीन, मोमत्संग कांगरी मोहीम अशा अनेक उल्लेखनीय मोहिमांमध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवलाय.
3/7
![पूर्णा मालवथ
पूर्णा मालवथ हिनं वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करून देशातील सर्वात लहान एव्हरेस्टवीर तरुणी होण्याचा विक्रम केलाय.
पूर्ण ही मूळची तेलंगणाची... अत्यंत कठिण समजल्या जाणाऱ्या तिबेटीयन बाजुनं तिनं एव्हरेस्टवर चढाई केलीय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188277-treaaak5.jpg)
4/7
![अंशु जामसेनपा
अंशु जामसेनपा यांनी आत्तापर्यंत तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलंय. उल्लेखनीय म्हणजे, यातील दोन आरोहणं त्यांनी केवळ दहा दिवसांच्या अंतरात एकाच मोसमात यशस्वी केली.
अंशु जतामसेनपा या मूळच्या अरुणाचल प्रदेशच्या... तीन वेळा यशस्वीरित्या माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अंशु या भारतातील एकमेव महिला ठरल्या आहेत. त्यांचा आणखी एक रेकॉर्ड म्हणजे, त्यांनी हिमालयाचे तीन शिखरं (लोबुचा २००७५ फूट उंच, पोखाल्डे १९३४३ फूट उंच आणि आइलँड २०३०५ फूट उंच) केवळ सहा दिवसांत सर केलीत. आत्तापर्यंत त्यांनी ९ कठिण मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188280-anshue.jpg)
अंशु जामसेनपा अंशु जामसेनपा यांनी आत्तापर्यंत तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलंय. उल्लेखनीय म्हणजे, यातील दोन आरोहणं त्यांनी केवळ दहा दिवसांच्या अंतरात एकाच मोसमात यशस्वी केली. अंशु जतामसेनपा या मूळच्या अरुणाचल प्रदेशच्या... तीन वेळा यशस्वीरित्या माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अंशु या भारतातील एकमेव महिला ठरल्या आहेत. त्यांचा आणखी एक रेकॉर्ड म्हणजे, त्यांनी हिमालयाचे तीन शिखरं (लोबुचा २००७५ फूट उंच, पोखाल्डे १९३४३ फूट उंच आणि आइलँड २०३०५ फूट उंच) केवळ सहा दिवसांत सर केलीत. आत्तापर्यंत त्यांनी ९ कठिण मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत.
5/7
!['पद्मश्री' संतोष यादव
ज्येष्ठ महिला गिर्यारोहक संतोष यादव संमेलनाच्या उदघाटक असणार आहेत. संतोष यादव या एव्हरेस्टवर दोन वेगवेगळ्या आरोहण मार्गाने चढाई करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. कांगशुंग फेस या अवघड चढाई मार्गावरील एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केलं होतं.
संतोष यादव या मूळच्या हरियाणातल्या... २००० साली 'पद्मश्री' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. 'माऊंट नून-कून'च्या मोहीमेत सहभागी होणाऱ्या ९ जणांच्या टीममध्ये त्या एकट्या महिला होत्या.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188272-treaaak3.jpg)
'पद्मश्री' संतोष यादव ज्येष्ठ महिला गिर्यारोहक संतोष यादव संमेलनाच्या उदघाटक असणार आहेत. संतोष यादव या एव्हरेस्टवर दोन वेगवेगळ्या आरोहण मार्गाने चढाई करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. कांगशुंग फेस या अवघड चढाई मार्गावरील एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केलं होतं. संतोष यादव या मूळच्या हरियाणातल्या... २००० साली 'पद्मश्री' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. 'माऊंट नून-कून'च्या मोहीमेत सहभागी होणाऱ्या ९ जणांच्या टीममध्ये त्या एकट्या महिला होत्या.
6/7
!['पद्मश्री' चंद्रप्रभा ऐतवाल
देशातील महिला गिर्यारोहकांच्या अध्र्वर्यू अशा गिर्यारोहक चंद्रप्रभा ऐतवाल या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. चंद्रप्रभा ऐतवाल या १९७२ पासून गिर्यारोहणात कार्यरत आहेत. कांचनजुंगा, नंदादेवी, सतोपंथ अशा अनेक कठिण मोहिमांत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल ३२ मोहिमांत आपला सहभागा नोंदवलाय.
चंद्रप्रभा ऐतवाल या मूळच्या उत्तराखंडच्या... आज त्या ७५ वर्षांच्या आहेत... पण, तरीही त्या मोठ्या आत्मविश्वासाने अनेक मोहिमांत सहभागी होताना दिसतात. माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा प्रयत्न केलाय. १९९० साली चंद्रप्रभा ऐतवाल यांचा देशातील सर्वोच्च अशा 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय.
याशिवाय, २००९ साली तेनझिंग नॉर्वे साहसी पुरस्कार, १९८४ साली भारतीय गिर्यारोहण फाउंडेशनकडून रजत पदक तसंच १९८१ मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188269-treaaak2.jpg)
'पद्मश्री' चंद्रप्रभा ऐतवाल देशातील महिला गिर्यारोहकांच्या अध्र्वर्यू अशा गिर्यारोहक चंद्रप्रभा ऐतवाल या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. चंद्रप्रभा ऐतवाल या १९७२ पासून गिर्यारोहणात कार्यरत आहेत. कांचनजुंगा, नंदादेवी, सतोपंथ अशा अनेक कठिण मोहिमांत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल ३२ मोहिमांत आपला सहभागा नोंदवलाय. चंद्रप्रभा ऐतवाल या मूळच्या उत्तराखंडच्या... आज त्या ७५ वर्षांच्या आहेत... पण, तरीही त्या मोठ्या आत्मविश्वासाने अनेक मोहिमांत सहभागी होताना दिसतात. माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा प्रयत्न केलाय. १९९० साली चंद्रप्रभा ऐतवाल यांचा देशातील सर्वोच्च अशा 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. याशिवाय, २००९ साली तेनझिंग नॉर्वे साहसी पुरस्कार, १९८४ साली भारतीय गिर्यारोहण फाउंडेशनकडून रजत पदक तसंच १९८१ मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय.
7/7
![महाराष्ट्रातील तमाम भटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या गिरिमित्र संमेलनाचे हे १५ वे वर्ष! हा कार्यक्रम येत्या ९ व १० जुलै २०१६ रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड इथं आयोजित करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, यावर्षीची या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे 'गिर्यारोहण आणि महिला'...
गिर्यारोहणासारख्या साहसी क्षेत्रात महिलांचा सहभाग फारसा नसला तरी दुर्लक्षित करण्यासारखा नक्कीच नाही. या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अशाच काही देशभरातील महिला आपल्याला या कार्यक्रमात भेटणार आहेत.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/06/22/188264-treaaak1.jpg)