Sun Transit In Aquarius : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांच्या या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. ग्रहांचा राजा सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदलणार आहे. सध्या सूर्यदेव मकर राशीत असून तो फेब्रुवारीच्या सुरुवातीला कुंभ राशीत गोचर करणार आहे. या स्थितीत सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव हा त्याचा सहवासात असणार आहे. पण पिता पुत्र यांच्यात वैराची भावना असल्याने काही राशींसाठी हा योग लाभदायक ठरणार आहे. या लोकांना पद आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. चला मग यात तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घेऊयात. (After almost 1 year of Sun transit or Surya Gochar in Aquarius the zodiac sign people have immeasurable wealth)
सूर्यदेवाचे भ्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. सूर्यदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या घरात असणार आहे . तसंच, तो मंगळाचा मित्र असल्याने तुमच्या राशीचा स्वामी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळणार आहेत. काही जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच वेळी, विवाहित लोकांचं त्यांच्या जोडीदाराशी नातं मजबूत होणार आहे. हा कालावधी तुमच्या करिअरमध्ये विशेष यश लाभणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने सूर्य ग्रहाच्या राशीतील बदल शुभ परिणाम घेऊन येणार आहे. हे संक्रमण तुमच्या राशीतून कर्माच्या घरावर असणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळणार आहे. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी लाभणार आहे. व्यावसायिकांना यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्याच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून पाचव्या भावात असणार आहे. तुम्हाला संततीचा आनंद मिळणार आहे. तसंच, मुलांशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. यावेळी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये मोठे यश प्राप्त होईल.सूर्य देव तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घराचा स्वामी असल्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)