Astrology : कोणत्या राशीसाठी कोणत्या धातूची अंगठी लाभदायी?

धातूची अंगठी वापरण्यापूर्वी पाहा ही महत्त्वाची बातमी... 

Updated: Oct 8, 2022, 09:46 AM IST
Astrology : कोणत्या राशीसाठी कोणत्या धातूची अंगठी लाभदायी?  title=
Astrology auspicious metal rings for each sign

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाची अंगठी परिधान करणं त्या त्या राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय लाभदायी असतं. ग्रहांप्रमाणेच ठराविक राशीसाठी ठराविक धातू फायद्याचे ठरतात. धातुवरून राशीला मिळणारे फायदे आणि तोटेही ठरतात. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कोणत्या धातूच्या अंगठ्या लाभदायी ठरतात... 

मेष- या राशीसाठी तांब्याची (Copper) अंगठी फायद्याची असते. मंगळवारी या धातूची अंगठी घातल्यास द्विगुणित लाभ होतो. 

वृषभ- या राशीच्या व्यक्तींनी चांदीचा (Silver) वापर असलेली अंगठी वापरावी. यामुळम नोकरी आणि व्यापारात फायदा होतो. 

मिथुन- या राशीसाठी कांस्यापासून (Bronze) तयार करण्यात आलेल्या अंगठ्या वापराव्यात. मनस्थिती शांत ठेवण्यासाठी ही अंगठी फायद्याची. 

कर्क- या राशीच्या व्यक्तींनी चांदीचा वापर करावा. सोमवारच्या दिवशी त्यांनी चांदीची अंगठी वापरल्यास यामुळं लाभ होतात. याव्यतिरिक्त पितळही वापरावं. 

सिंह- सिंह राशीच्या व्यक्तींना पितळ आणि सोन्यापासून (Gold) तयार करण्यात आलेल्या अंगठ्या वापराव्या. यामुळं गुरुचे शुभाशीर्वाद मिळतात. 

कन्या- चांदी आणि सोनं या राशीला फळतं. त्यामुळं या धातूंचं मिश्रण असणाऱ्या अंगठ्या त्यांनी परिधान कराव्यात. 

तुळ- शुक्रवारच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी चांदीची अंगठी मधल्या बोटात घालावी. यामुळं यशप्राप्ती होते. 

वृश्चिक- तांबं आणि चांदीच्या अंगठ्या वापरणं या राशीसाठी योग्य ठरेल. त्यांना भरभराट पाहायला मिळेल. 

धनु- गुरुवारी या राशीच्या व्यक्तींनी तर्जनीमध्ये पितळ किंवा सोनं परिधान करावं. 

मकर- या राशीसाठी लोखंड अतिशय लाभदायी. हा धातू शनीशी संबंधित असल्यामुळं त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. 

कुंभ- अष्टधातूंपासून तयार करण्यात आलेल्या अंगठ्या किंवा तत्सम वस्तू या राशीसाठी फायद्याच्या. शमिवारच्या दिवशी मध्यमेत अंगठी घालणं या राशीला फळतं. 

मीन- या राशीसाठी सोनं सर्वोत्तम ठरतं. गुरुवारच्या दिवशी तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घातल्यामुळं या राशीच्या व्यक्तींवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.