Chanakya Niti for Great People: प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. तो त्याच्या गुणांमुळे ओळखला जातो. आचार्य चाणक्य सांगतात, ज्या लोकांमध्ये 3 विशेष गुण असतात, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. अशा लोकांच्या मागे जग धावते आणि ते महान ठरतात. चाणक्य नीति अनेकांना माहित आहे. सुमारे 3000 वर्षांपूर्वी ही नीति आहे., आचार्य चाणक्य, ज्यांचा जन्म भारतात झाला. त्यांनी नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला 'चाणक्य नीति' असेही म्हणतात. या पुस्तकात त्यांनी जीवन, समाज, राजकारण आणि राष्ट्राशी निगडित अशा रहस्यमय गोष्टी लिहिल्या आहेत. ज्या शेकडो वर्षांनंतरही आजही प्रासंगिक आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी पुरुषांच्या अशा 3 गुणांचे वर्णन केले आहे, जे कोणत्याही व्यक्तीला महान बनवतात. (Chanakya Niti for Great People) अशा लोकांचा वेगळा प्रभाव असतो.
जे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात तसेच त्यांना नातेसंबंधांचा आदर कसा करायचा हे माहित असते. ते प्रत्येक नातेसंबंध प्रामाणिकपणे हाताळतात आणि कोणाशीही भेदभाव करत नाही. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो, असे आचार्य चाणक्य सांगतात. प्रत्येकाला त्यालाजवळ बोलण्यास आवडते. अशा लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते आणि त्यांचे म्हणणे अमलातही आणले जाते, असे चाणक्य नीतित सांगितले आहे.
जी व्यक्ती नेहमी इतरांच्या मदतीसाठी धावून जाते. ते आपल्या कृतीतून दाखवून देतात. ते कधीही तोंडाची वाफ घालवत नाहीत. असे लोक सर्वांनाच आवडत असतात. अशा लोकांना त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे सर्वत्र आदर मिळतो. समाजात त्यांची प्रतिष्ठा खूप वाढते. असे लोक त्यांच्या प्रामाणिकपणाशी तडजोड करत नाहीत. अशा लोकांना सज्जन म्हणतात. त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि तो सर्वांचा लाडका बनतो, असे चाणक्य नीतित सांगितले आहे.
चाणक्य नीतिनुसार जी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत आणि मोठ्या संकटातही संयमी राहते. विचारपूर्वक गोष्ट करते. तसेच संकटकालीन परिस्थितीतही ते आपली प्रतिष्ठा गमावत नाहीत, ते महान ठरण्यास पात्र आहे. या प्रकारची व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या हृदयावर आणि मनावर नियंत्रण ठेवते. आनंदाच्या प्रसंगी ते फार उत्साहीही नसतात की दुःखाच्या प्रसंगी फारसे निराशही नसतात. ते समाजाला प्रकाशाच्या किरणांप्रमाणे मार्गदर्शन करतात आणि वाईट काळात प्रेरणा देतात, असे चाण्यक्य सांगतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)