Chanakya Niti : सुखी जीवनाचं रहस्य दडलंय 'या' 5 गोष्टीमध्ये, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांनी पूर्वजन्माशी संबंधिक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया ही 5 सुखं कोणती आहेत.

Updated: Jan 19, 2023, 02:41 PM IST
Chanakya Niti : सुखी जीवनाचं रहस्य दडलंय 'या' 5 गोष्टीमध्ये, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती title=

Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये (Chanakya Niti) अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. यामध्ये गेल्या जन्मात आपण केलेल्या कर्माच्या आधारे अशी सुखं प्राप्त होतात, ज्यामुळे तुमचं जीवन परिपूर्ण होऊन जातं. तुम्हाला माहिती आहेत का ही 5 सुखं कोणती आहेत? आचार्य चाणक्य यांनी पूर्वजन्माशी संबंधिक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया ही 5 सुखं कोणती आहेत.

जोडीदार

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, कलियुगामध्ये चांगला नवरा तसंच पत्नी मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. ते म्हणतात, ज्या व्यक्तींनी गेल्या जन्मामध्ये चांगलं कर्म केलंय त्यांनाच चांगला जोडीदार किंवा जीवनसाथी मिळतो. त्यांचे हे जोडीदार त्यांना शेवटपर्यंत साथ देतात.

पैशाचा योग्य तो वापर करणं

बुद्धी ही प्रत्येकामध्ये असते. मात्र त्याचा योग्य वापर करणं शिकलं पाहिजे. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला तुमचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुरक्षित तसंच आनंदी बनवायचा असेल तर तुमच्याकडे मिळालेल्या पैशांचा योग्य वापर करण्याची बुद्धी पाहिजे. कारण आपणं पाहिलं की, प्रत्येकाकडे पैसा असतो पण त्याचा योग्य वापर करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. 

दानाची मनामध्ये भावना

पैसा हा प्रत्येकाला हवा असतो, तसंच आपल्या चांगल्या भविष्यासाठी पैसा साठवलं ही चांगली मानली जाते. मात्र त्याचसोबत तुम्ही चांगल्या मनाने गरजुंनाही मदत केली पाहिजे. तुमच्या मनामध्ये दानाची भावना निर्माण झाल्याने जीवन आनंददायी बनतं. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, दान केल्याने कधीही तुमच्याकडील पैसा कमी होत नाही, उलट त्यामध्ये दुपटीने वाढ होते.

योग्य पचनशक्ती

चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्यांची पचनशक्ती चांगली असते, त्या व्यक्ती फार भाग्यवान असल्याचं मानलं जातं. मुख्य म्हणजे, चांगले अन्न खाल्ल्याने तुम्हाला आनंद मिळतो. मात्र जर हे अन्न पचलं नाही तर शरीराला त्रास होऊन अनेक आजार तुमच्या मागे लागतात. त्यामुळे योग्य पचन होणं हा एक असा आनंद आहे जो व्यक्तीला दीर्घकाळ निरोगी ठेवतो.

कामावर नियंत्रण ठेवणं

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, चांगलं काम करण्याची क्षमता असलेले लोक भाग्यवान असतात. ज्यांना वाईट शक्ती कशी नियंत्रित करायची याची कल्पना असते, तो जीवनात नेहमी आनंदी असतो, असं मानतात.