Astrology: घोड्याचा नालचा अशा प्रकारे वापर केल्यास, नोकरी-व्यवसायात प्रगती

ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते लोह हा शनिदेवाचा आवडता धातू आहे.

Updated: Apr 12, 2022, 10:26 PM IST
Astrology: घोड्याचा नालचा अशा प्रकारे वापर केल्यास, नोकरी-व्यवसायात प्रगती title=

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक धातूला विशेष महत्त्व आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि लोखंड या सर्व धतूंचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहांसोबत आहेत. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते लोह हा शनिदेवाचा आवडता धातू आहे. अनेक वेळा शनीच्या वक्र दृष्टीपासून लांब राहण्यासाठी घोड्याची नाल घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही घराबाहेर देखील लोखंडी नाल लावली जाते, परंतु असं का केलं जातं आणि याचे फायदे काय आहेत. हे बऱ्याच लोकांना माहित नसतं.  चला तर मग जाणून घेऊया घोड्याची नाल घालण्याचे फायदे.

शनि दोष

ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याचा नाल लावल्याने शनिदेवाच्या वक्र दृष्टीपासून लांब राहातो. यासोबतच वास्तुदोषही दूर होतात. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती चालू असेल, तर त्याच्या पलंगावर घोड्याची नाल ठेवल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते.

व्यवसायातील यश

खूप प्रयत्न आणि मेहनत करुनही करिअर आणि व्यवसायात यश मिळत नसेल, तर घोड्याच्या नालची अंगठी बनवून मधल्या बोटात घालण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने नोकरीत यश मिळते असे मानले जाते.

याशिवाय व्यवसायात यश मिळवण्यासाठी व्यवसायाच्या ठिकाणी काळ्या नालची स्थापना करावी. असे केल्याने व्यवसायात आर्थिक यश मिळते असे मानले जाते.

धनलाभ

ज्योतिष शास्त्रानुसार धनलाभासाठीही घोड्याची नाल वापरली जाऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला संपत्ती हवी असेल, तर त्याने तिजोरीत घोड्याचा नाल ठेवावा.

रोगापासून मुक्ती

कुटुंबातील कोणताही सदस्य सतत आजारी राहिल्यास घोड्याच्या नालपासून बनलेले चार खिळे, 1.25 किलो उडीद डाळ आणि एक सुकं खोबरं घेऊन ते रुग्णावरुन 11 वेळा काढून नदीत फेकून द्यावं. असे मानले जाते की, असे केल्याने मोठ्या प्रमाणात रोगापासून मुक्ती मिळते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)