Gajkesari Rajyoga 2024 : मकर संक्रांतीनंतर ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीत अतिशय शुभ असा राजयोग निर्माण होणार आहे. येत्या 18 जानेवारीला चंद्र मेष राशीत गोचर करणार आहे. मेष राशीत आधीपासून गुरु विराजमान आहे. त्यामुळे मेष राशीत गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. या दोन ग्रहांच्या मिलनातून गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. गजकेसरी राजयोगाचा प्रभाव 12 राशीवर पडणार असून त्यातील 4 राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीसोबत धनलाभ होणार आहे. (Gajkesari Rajyoga 2024 after Makar Sankranti The Golden Age of these Zodiac sign money is money with progress)
गजकेसरी राजयोग तुमच्या राशीच्या चढत्या घरात तयार होत असल्याने तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. भौतिक सुखसोयींकडे तुमचा अधिक कल असणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचं संबंध सुधारणार आहेत. तसंच, यावेळी तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं संबंध सुधारणार आहात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत निश्चित केलेली उद्दिष्टे झपाट्याने साध्य करण्यात यशस्वी व्हाल.
गजकेसरी राजयोग तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार असून सोबत उत्पन्नाचं नवे स्रोत निर्माण होणार आहे. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढ होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा मिळणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
गजकेसरी राजयोग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात तयार होतो आहे. त्यामुळे हा राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या योगामुळे वाहन आणि मालमत्तेचे सुख तुम्हाला मिळणार आहे. भौतिक सुखसोयींकडे तुमचा अधिक कल असणार आहे. ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट, जमीन आणि मालमत्तेशी संबंधित आहे, त्यांना चांगला नफा मिळणार आहे. तर नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले फायदे मिळणार आहेत.
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून तुमच्या धन आणि वाणीच्या घरावर हा राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळणार आहेत. भौतिक सुखसोयींकडे तुमचा अधिक कल असणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचं संबंध सुधारणार आहेत. तसंच तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)