Ganesh Chaturthi 2022: लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येतं आहे. घरोघरी आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतं आहे. देशातील वातावरण गणेशमय झालं आहे. कोकणात प्रत्येक घरात गणरायाचं आगमन होतं. पण काही घरांमध्ये गणपती घरी आणण्याची प्रथा नाही. अशावेळी गणेशोत्सवानिमित्त तुम्ही गणपती मंदिरात जाऊन पूजाअर्चा करता. पण आम्हाला सांगा देशातील सर्वात जुनी गणपतीची मंदिरं तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घ्या कुठली आहेत ही मंदिरं...
(ganesh chaturthi 2022 these are the oldest Ganesha temples in India and know where the temples are located trending news)
सिद्धिविनायक मंदिर मुंबईत सर्वात जुनं आणि प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. हे गणपतीच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आणि नावाजलेलं आहे. या मंदिराची स्थापना 1801 मध्ये झाल्याचं मानलं जातं. या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. जगभरातून या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त या मंदिरात येतात.
हे पुण्यातील सुमारे 130 वर्षे जुने मंदिर आहे. साडेसात फूट लांब आणि चार फूट रुंद गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली असल्याने तिचं रुप देखणं आहे.
मोती डुंगरी मंदिर हे राजस्थानच्या जयपूरमधील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 1761 मध्ये बांधले गेलं आहे. या मंदिरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे इथे भाविकांची मोठी गर्दी होते.
हे मंदिर इदगुंजी, कर्नाटकमध्ये आहे. हे मंदिर सुमारे 1500 वर्षे जुने असून हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो लोक बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येतात. कर्नाटकमध्ये कधी गेल्यास या मंदिराला नक्की भेट द्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)