Gudi Padwa 2023 Puja: हिंदू कॅलेंडरनुसार, हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला होते. वर्षाचा पहिला सण म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुढी पाढवा या सणाला फार महत्व आहे. आध्यात्मिकदृष्ट्या देखील या सणाचे खूपच महत्व आहे. गुढी पाढव्याच्या दिवशी काही पूजा विधी केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. यामुळे या दिवशी देवतांची पूजा करून काही उपाय केल्याने भक्तांना वर्षभर सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते (Gudi Padwa 2023 Puja).
हिंदू पंचांगानुसार 22 मार्च 2023 यंदाचा गुढी पाढवा सण साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्या दिवशी काही धार्मिक उपाय केल्यास निश्चित फायदा होईल. ज्याचा तुम्हाला वर्षभर लाभ मिळेल. गुढी पाडव्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असा समज आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले. यावेळी त्यांचे स्वागत गुढ्या उभारुन करण्यात आले. यामुळेच आनंद सोहळा म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. गुढी पाढवा हा शुभ मुहूर्त मानला जातो. यामुळेच अनेक जण सोनं खरेदी देखील करतात. गुढी पाडव्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा बाल्कनीत गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते, भाग्यरेषा चमकते.