Jupiter And Venus Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात नऊ ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यासोबत ते उदय आणि अस्तही होतात. ग्रहांच्या या उदय आणि अस्तमुळे मानवी जीवन आणि पृथ्वीवर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम दिसून येतो. येत्या जून महिन्यामध्ये देवांचा गुरु बृहस्पति आणि धनसंपत्तीचा कारक शुक्र उदय होणार आहे. अशा स्थितीत गुरु आणि शुक्रच्या उदयमुळे काही राशींच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरु होणार आहे. त्यांच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे. (Guru Shukra Uday 2024 Rising of Venus and Jupiter after 50 years in June Golden time of these zodiac sign people started)
गुरु आणि शुक्राचा उदय या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बृहस्पति या राशीच्या लोकांच्या राशीत उदय होणार आहे. तर कुंडलीत शुक्र तुमच्या 12व्या घरात उदय होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. तसंच तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. यावेळी तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होणार आहात. तसंच, करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक यश मिळणार आहे. तुमच्या सर्व कामाच्या योजना यशस्वी होणार आहे. त्याचबरोबर ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळणार आहे.
या लोकांच्या कर्म घरात गुरुचा उदय आणि उत्पन्न घरात शुक्रदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्र उदय या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना आर्थिक फायदासह प्रचंड संपत्ती वाढ होणार आहे. ज्या लोकांची पदोन्नती अनेक काळापासून रखडलेली आहे त्यांना चांगली बातमी मिळणार आहे. मित्रांसोबत नातं चांगल होणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. अगदी गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा मिळणार आहे.
तुमच्या राशीतून बृहस्पति ग्रह उत्पन्नाच्या घरात आणि शुक्र ग्रह 12व्या भावात उदयास येणार आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्राचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. तसंच, ग्रहांच्या या स्थितीमुळे व्यवसायात यश मिळणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. तसंच, व्यवसायिकांनी भविष्यात नफा मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)