मुंबई: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील अडचणींची पूर्वकल्पना मिळाली तर दिवस अधिक चांगला घालवणं सोपं होतं. त्यासाठीच जाणून घ्या 12 राशीसाठी कसा असेल आजचा दिवस.
मेष- कुटुंबियांसोबत वादविवाद टाळा. व्यवसाय चांगला सुरू होईल.
वृषभ- आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. म्हणावा तर चांगलाही नाही आणि म्हणावा तर वाईट देखील नाही. प्रेम आणि व्यवसायात आज आपली स्थिती ठिकठाक असणार आहे.
मिथुन- डोकेदुखी आणि डोळ्याच्या समस्या उद्भवतील. आज काळजी घेणं अत्यावश्यक आहे. थोडंही दुर्लक्ष करणं आपल्या आरोग्यावर बेतू शकतं. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला.
कर्क- आज आपली कमाई खूप चांगली होणार आहे. प्रेम आणि व्यवसायामध्ये काळजी घ्या.
सिंह- अधिकारी आज आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत. प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच शुभ आहे. कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
कन्या- आज आपलं मन अस्वस्थ राहिल. धार्मिक गोष्टींमध्ये आज थोडं लक्ष घाला.
तुळ- आज आपल्याला दुखापत होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या. आज समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रेम आणि व्यवसायात आज प्रगती होईल.
वृश्चिक- काम किंवा नोकरीची संधी आली असेल तरी आज ती स्वीकारू नका याचं कारणं आपलं नुकसान होऊ शकतं. प्रेमात देखील आज सावधगिरी बाळगा. कोणतीही जोखीम उचलू नका.
धनु- शत्रूंवर आज विजय मिळवण्यात यश य़ेईल. आज आपलं आरोग्य बिघडू शकतं.
मकर - व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ- आईची काळजी घ्या. डोक्याच्या समस्या खूप जास्त त्रासदायक असतील. प्रेमात आज परिस्थिती ठिक असेल. व्यवसायाच फायदा होईल.
मीन- लवकरच आपलं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहिल. व्यवसायात यश मिळेल.