Sleep Astro Tips : आजकाल प्रत्येकाचं आयुष्य धावपळीचं झालं आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर कधी एकदा रात्री झोपतो असं होतं. मात्र अनेकजणांना रात्री एका ठराविक वेळी जाग येण्याची सवय होते. आपण याकडे जास्त लक्ष न देता पुन्हा झोपी जातो. मात्र सतत झोपेतून जाग येण्यामागे काय कारणं असू शकतात, हे जाणून घेण्याचा कधी तुम्ही प्रयत्न केला आहे का?
तणावासह अनेक प्रकारची मानसिक-शारीरिक कारणं वारंवार निद्रानाशासाठी जबाबदार असतात. परंतु यामागे आणखी एक कारण असू शकते. रात्रीची झोप वारंवार उघडणं याचं रहस्य धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे. दरम्यान एका विशिष्ट वेळी झोपेतून जागं होण्याचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊया.
जर तुम्हाला दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत जाग येत असेल तर त्याचा अर्थ तुमच्या मनात काही ना काही काळजी राहिलेली असू शकते. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा थंड किंवा सामान्य पाण्याने धुणं फायदेशीर ठरेल.
जर तुमची गाढ झोप अचानक रात्री 11 ते 1 च्या दरम्यान उघडत असेल तर हे तुमच्या मनाच्या विचलित होण्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार न करणं योग्य ठरेल. अशावेळी सकारात्मकतेसाठी काहीतरी ऐका किंवा वाचा.
रात्री 12 ते 2 च्या दरम्यान जाग येण्याचा अर्थ असा असू शकतो की, तुमच्या आजूबाजूला अज्ञात शक्ती आहे. ही शक्ती तुम्हाला जीवनाच्या उद्दिष्टांची जाणीव करून देते.
जर या वेळेत तुम्हाला जाग येत असेल तर याचा अर्थ तुमच्या मनात प्रचंड राह आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी हात-पाय धुवा आणि थंड पाणी प्या.
जर तुम्ही दररोज पहाटे 3:00 च्या सुमारास उठत असाल तर हे एक लक्षण आहे की ब्रह्मांड आणि काही दैवी शक्ती तुम्हाला उठवू इच्छिते. हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेची पूजा करता. देवाचा नामजप तुमच्यासाठी शुभ असू शकतो. या वेळी अनेक शक्ती तुम्हाला भेटू इच्छित असतात असं मानलं जातं.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )