Chandra Grahan 2024 : ग्रहण हे वैज्ञानिक घडामोड असली तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. नवीन वर्षात 2024 मध्ये यंदा 5 ग्रहणं असणार असून 2 सूर्यग्रहण आणि 3 चंद्रग्रहण आहे. प्रत्येक ग्रहणाचं स्वतःचं महत्त्व आहे. त्यामुळे नवीन वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे सोमवारी 25 मार्चला होळीच्या दिवशी (Holi 2024 Date) आहे. पंचांगानुसार ग्रहणाच्या वेली चंद्र कन्यात विराजमान असणार आहे. कन्या राशीत केतू आधीच विराजमान असणार आहे. होळीच्या दिवशी असणाऱ्या चंद्रग्रहणाचा काही राशींसाठी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. (In the upcoming year 2024 Holi will be the first lunar eclipse of the year these zodiac signs will get the support of destiny)
पंचांगानुसार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10.24 ते दुपारी 3.01 पर्यंत असणार आहे. हे ग्रहण एकूण 4 तास 36 मिनिटांचं असणार आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सुतक कालावधी वैध नसणार आहे. चंद्रग्रहण काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. त्यामुळे कामाची चिंता कमी होणार आहे. शारीरिक आणि मानसिक तणावातून तुम्हाला आराम मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. पालकांशी नातं घट्ट होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे.
चंद्रग्रहणाचा सूर्याच्या राशीवर शुभ प्रभाव असणार आहे. या राशीतील चंद्रग्रहण नवीन आनंद देणारा ठरणार आहे. खर्च कमी होणार असून बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही दुसरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला यश मिळणार आहे. उत्पन्नाचं नवीन स्रोत मिळणार आहेत.
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचं रखडलेलं काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. जीवनात सकारात्मक प्रभाव पडणार आहे. चंद्र देवाच्या कृपेने शारीरिक आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळणार आहे. नियोजित कामं पूर्ण होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या पालकांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)