आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ११ जानेवारी २०१९

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Jan 11, 2019, 08:39 AM IST
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ११ जानेवारी २०१९ title=

मेष - काही नवीन अनुभव येतील. वेगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. स्वतःचा मुद्दा स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांचा मुद्दाही योग्य पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. 

वृषभ - चांगला दिवस आहे. पैशांशी संबंधित काही मुद्द्यांकडे लक्ष द्या. सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहा. नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही समोरच्याला योग्य सल्ला देऊ शकाल.

मिथुन - स्वतःच आखलेल्या योजनेवर विश्वास ठेवा. पैशांच्या संदर्भात चांगली ऑफर मिळू शकते. त्यावर गंभीरपणे विचार करा. करिअर, संपर्क आणि स्वतःची प्रतिमा यासाठी चांगला दिवस आहे. आपल्या जबाबदाऱ्या आणि आवश्यक काम करा.

कर्क - लोकांशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. करिअरसंबंधी अधिक स्पष्टता येईल. आपल्या क्षेत्राशी जोडलेले एखादे गुपित तुम्हाला आज समजेल. तुमचा प्रस्ताव जास्त लोक स्वीकारू शकतात. 

सिंह - आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. कितीही व्यग्र असला, तरी कुटुंबीयांसोबत संपर्कात राहा. काही महत्त्वाच्या विषयात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याची संधी मिळू शकते.

कन्या - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. आर्थिक अडचण कमी होण्याची शक्यता. एखाद्या खास व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही प्रभावशील राहाल. अनेक गोष्टी सहजपणे सुटतील.

तूळ - एखादे खास काम करण्यासाठी तुम्ही खूप उत्साही असाल. नवीन अनुभव मिळतील. काही नव्या ओळखी होतील. ज्यांचा भविष्यात तुम्हाला उपयोग होऊ शकतो. व्यवसायात एखादा व्यवहार करण्यासाठी उत्सुक असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी योग्य आहे. 

वृश्चिक - अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने समजण्यास तुम्हाला मदत होऊ शकेल. नवी माहिती मिळेल. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे असू शकतात. सगळं काम एकट्यानेच करण्याची इच्छा तुमच्या मनात येऊ शकते. लोक तुमच्यामुळे प्रभावित होऊ शकतात. पैशांशी संबंधित काही नवीन संधी तुम्हाला मिळू शकते. 

धनू - अनेक गोष्टी नेमकेपणाने समजण्यास आज तुम्हाला मदत होईल. नवीन माहिती मिळेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असू शकतात. आत्मविश्वास जास्त राहिल. पैसे कमाविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. वेळ तुमच्यासोबत असेल. वादातूनही तुम्हालाच फायदा होण्याची शक्यता.

मकर - वेळ मिळाला तर थोडा वेळ विश्रांती घ्या. कोणत्या आर्थिक योजनेवर तुम्ही काम करत असाल, तर पैशांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदारासाठी एखादे छोटे-मोठे गिफ्ट घेऊ शकता. वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठीही मदत होऊ शकते. 

कुंभ - एखादे कायदेशीर प्रकरण असेल, तर त्याबद्दल चांगली माहिती मिळू शकते. दोस्तांसोबत काम करण्यासाठी प्लॅनिंग करू शकता. लोकांसोबत जमवून घ्या आणि नवीन ओळखीही होतील. गोचर कुंडलीत कर्मामध्ये चंद्र असल्याने यश मिळण्याचे योग आहेत. 

मीन - आपले विचार स्पष्टपणे मांडा. कामामध्ये लोक तुमच्याशी सहमत होऊन तुमचे म्हणणे ऐकू शकतात. ऑफिस आणि व्यवसायामध्ये यश मिळेल. जर प्रयत्न केले तर  एखाद्या खास व्यक्तीला प्रभावित करू शकाल. एखाद्या विश्वासू मित्राला सोबत घेऊन एखादे काम करा.