Mars Ketu Yuti 2023 in Tula: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. या काळात काही ग्रहांचा इतर ग्रहांशी संयोग बनतो. या संयोगातून अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यांचा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पडतो. सध्या मायावी ग्रह केतू शुक्राच्या तूळ राशीत आहे.
दरम्यान येत्या 2 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असणार आहे. दरम्यान मंगळ आणि केतूचा संयोग काही लोकांना अपार यश, संपत्ती आणि आनंद देणार आहे. जाणून घेऊया मंगळ-केतू संयोगाने कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
सिंह रास
मंगळ आणि केतूची युती सिंह राशीच्या लोकांना मोठे निर्णय घेण्यास धैर्य देणार आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खूश असणार आहेत. या काळात तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
कन्या रास
मंगळ-केतूचा युती कन्या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ देणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळतील. या काळात तुम्ही भरपूर संपत्ती निर्माण करू शकता. मीडियाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणीही तुमचा काळ खूप चांगला जाणार आहे. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. भरपूर पैसा हाती लागणार आहे.
धनु रास
मंगळ आणि केतूच्या युतीमुळे धनु राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या काळात तुम्हाला परदेशातून पैसे मिळू शकतात. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. व्यावसायिकांना मोठी निविदा किंवा ऑर्डर मिळू शकते. काही मोठे यश मिळेल. जीवनात भौतिक सुखसोयी वाढवण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. कामाच्या ठिकाणीही सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी, मंगळ आणि केतूची युती करिअरचे नवीन मार्ग उघडेल. नोकरी बदलण्यासाठी उत्तम काळ आहे. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुम्ही शांततेने घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )