Budh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…

Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. 4 दिवसांमध्ये बुध संक्रमणामुळे 3 राजयोग जुळून आले आहेत. भद्रा, बुधादित्य आणि विपरीत राजयोग तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2023, 02:07 PM IST
Budh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात… title=
mercury transit make budhaditya rajyog viparit rajyog and bhadra yog get promotion success money job Budh Gochar 2023

Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह गोचरमुळे तब्बल 32 राजयोग आपल्या कुंडलीत तयार होतात असतात. जेव्हा कुंडलीतील घरामध्ये एकापेक्षा जास्त ग्रह यांची भेट होते म्हणजेच युती होते त्याला योग असं म्हणतात. काही योग हे अशुभ असतात तर काही शुभ असतात. 32 राजयोग पैकी तीन शुभ योग बुध ग्रहाच्या (Budh Gochar 2023) गोचरमुळे तयार होत आहे. 

कधी आहे बुध गोचर?

मंगळ गोचर झाल्यानंतर येत्या शनिवारी 8 जुलैला बुध गोचर होणार आहे. दुपारी 12.05 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत आधीपासून सूर्यदेव विराजमान आहे. त्यामुळे अशात बुध आणि सूर्याच्या भेटीतून बुधादित्य योग (budhadita rajyog ) आणि विपरीत राजयोग (viparit rajyog) तयार होत आहे. तर 11 जुलैला बुधाच्या उदयामुळे भद्रा राजयोग (bhadra yog) जुळून आला आहे. बुधाचे संक्रमण सिंह राशीत 25 जुलै 2023 रोजी पहाटे 4 वाजून 26 पर्यंत होणार आहे. (mercury transit make budhaditya rajyog viparit rajyog and bhadra yog get promotion success money job Budh Gochar 2023)

कन्या (Virgo)

कन्या राशीसाठी राजयोग शुभदायक असणार आहे. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे. परदेशात नोकरीची संधी आहे. धनसंपदेत वाढ होणार आहे. लव्ह लाइफमध्ये सकारात्मक घडामोडी घडणार आहे. करिअरचा आराखडा चढता असणार आहे. कार्यक्षेत्रात धनलाभ होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. 

मेष (Aries)

बुधाच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत तुमची आर्थिक बाजू मजबूत करतील. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. प्रेम आणि वैयक्तिक जीवन चांगले होईल.

मिथुन (Gemini)

बुध हा या राशीच्या चढत्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. उत्पन्नात घशघशीत वाढ होणार आहे. अचानक अनेक मार्गाने धनलाभ होणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना बुध गोचरमुळे मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. नवीन नोकरीची संधी आहे. धनलाभ आणि समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. जुन्या कामाच्या ठिकाणीही तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आयात निर्यात व्यवसायिकांना हा राजयोग फायदेशीर ठरणार आहे. ज्या कामात हात घालात त्यात तुम्हाला यश मिळेल. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी बुध गोचर लाभदायक ठरणार आहे. नवीन लोकांशी भेटीगाठी होणार आहे. ही ओळख तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहे. शत्रूवर मात करण्यात यश मिळेल. कोर्टकचेरीचे प्रकरण तुमच्या बाजूने लागणार आहे. तुमच्या जोडीदाराची प्रगती तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Budh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना

 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी बुध गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असेल. घरात शुभ कार्य ठरणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. व्यवसायातून धनलाभाचे योग आहेत. तुमच्या पर्सनल लाइफमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)