New year Astrology Tips For new Home: नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काहीच दिवस उरले आहेत (new year 2023) सगळीकडे न्यू ईअर च स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झाले (new year celebration) आहेत , बऱ्याच जणांनी येत्या वर्षात काय नवीन करायचं याच्या संकल्पना केल्या असतीलच. तर नवीन वर्षात नवीन घर घेऊया असाही संकल्प काही जणांनी नक्कीच बांधला असेल. (new year 2023 resolutions) आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकांचं स्वप्न असतं. त्यासाठी नवरा-बायको खूप कष्ट करतात आणि आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार घर घेण्याचा प्रयत्न करतात. पण वाढलेल्या महागाई आणि घरांच्या किंमती पाहता (recession and house prices are high) अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही.
अनेक वेळा लाख प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. कधी घराचं लोकेशन आवडत नाही तर कधी घर लोकेशन सर्वकाही आवडतं पण मूळ मुद्द्दा म्हणजे आपलं बजेट आणि घरांच्या किमतींचा ताळमेळ
काही केल्या लागत नाही. पण दुसरीकडे असं सुद्धा होत सर्व काही व्यवस्थित जुळून येत पण तरीही काहींना काही समस्या येते काहीतरी अडचण येते आणि आपला खोळंबा होतो. ज्योतिष्यशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत
काही ग्रह दोष असेल तर घर खरेदीमध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं. जर तुम्हाला ही घर खरेदी करताना काही अडचणी येत असेल तर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. (trending news astro tips for astrology upay for buying new home)
1. ज्योतिषशास्त्रानुसार गणरायाची नियमित पूजा-अर्चा केल्यास तुमचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. गणपतीला नियमितपणे लाल रंगाची फुलं अर्पण केली पाहिजे.
2. पाच मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन गूळ आणि गहू अर्पण केल्यास घर खरेदीतील अडथळे दूर होऊ शकतात.
3. अनेक प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल तर कडुलिंबाचे छोटे घर बांधून एका गरीब मुलाला द्या किंवा एखाद्या मंदिरात ठेवा.
4. लाल रंगाच्या कपड्यात 6 चिमूटभर कुमकुम, 6 लवंगा, नऊ टिकली, 6 कोवळ्या आणि नऊ मूठ माती घेऊन त्याची पोटली बनवा आणि नदीत ती प्रवाहित करा.
5. कुंडलीतील ग्रह तुमच्या घरासंबंधित खरेदीमध्ये अडचणी निर्माण करतात म्हणून अशावेळी एखाद्या ज्योतिषला आपली कुंडली दाखवून त्यांनी सांगितलेले उपाय करुन बघा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)