Panchang 8 February 2023: गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, Today 8 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात. 

Updated: Feb 8, 2023, 08:01 AM IST
Panchang 8 February 2023: गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा  title=

Today Panchang, 8 February 2023: आज बुधवार व्रताचा तिसरा दिवस आणि फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष. आज बुधवारी बाधा दूर करणाऱ्या श्री गणेशाची पूजा करावी. गणेशाची आराधना केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि कामात यश प्राप्त होते. ज्या लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत असेल त्यांनी बुधवार उपवास करून गणेशाची पूजा करावी. या दिवशी गणेशाला मोदक किंवा मुगाचे लाडू अर्पण करावेत. असे केल्याने बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. 

पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, अदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाच्या कामांचे वेळापत्रक बनवताना पाळावेत आणि टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते.

आजचा वार - बुधवार 

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्तच्या वेळा

सूर्योदय - सकाळी 07:16  
सूर्यास्त - संध्याकाळी 06:31
चन्द्रोदय - संध्याकाळी 06:30
चंद्रास्त- सकाळी 08:12  

अशुभ काळ 

राहू - दुपारी 03:20 ते दुपारी 04:42 
यम गण्ड - सकाळी 09:51 ते सकाळी 11:15 AM 
गुलिक - दुपारी 12:35 ते दुपारी 01:58 
दुर्मुहूर्त - सकाळी 09:18 ते सकाळी 10:02 

शुभ काळ

अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:13 ते दुपारी 12:57 
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 05:22 ते सकाळी 06:14 
अमृत काल- दुपारी 03:05 ते दुपारी 04:52 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)