Parama Ekadashi 2023 : आज अधिकमास किंवा पुरुषोत्तम महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. 3 वर्षांतून एकदा ही एकादशी येतात. या एकादशीला कमला किंवा परमा एकादशी असं म्हणतात. काही ठिकाणी या एकादशीला पुरुषोत्तमी एकादशी असंही संबोधलं जातं. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज पंचांगानुसाग हर्ष असा शुभ योग जुळून आला आहे. त्यासोबत आज शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार आहे. त्यामुळे आज एकादशी विष्णु आणि शनिदेव यांना एकत्र प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजचा उपवास अतिशय लाभदायक समजला जातो. भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दुर्लभ सिद्धी प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. अशा या एकदशीचं व्रताचे पूजा मुहूर्त, पूजा विधी, शुभ योग आणि पारायण वे जाणून घेऊयात.
परमा एकादशी ही अधिक मासात तीन वर्षांतून एकदा येते. या तिथीला भगवान विष्णूची उपासना केल्याने सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. त्याशिवाय आयुष्यातून दुःख आणि दारिद्र्य नष्ट होतं. शिवाय सर्व पापांचा नाश होऊ मोक्ष प्राप्त होतात असं म्हणतात. या तिथीचं व्रत करून कथा श्रवण केल्याने 100 यज्ञाइतकं पुण्य फळ असं म्हणतात. शंख, चक्र आणि गदा यांच्यासोबत असलेल्या भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदते.
एकादशी तिथी 11 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 36 मिनिटाने सुरुवात झाली आहे. ही तिथी आज सकाळी 8 वाजून 30 मिनिटाने संपणार आहे. उदय तिथीनुसार आज एकादशीचं व्रत करायचं आहे.
परमा एकादशी पूजा मुहूर्त - 12 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 28 मिनिटापासून 10 वाजून 50 मिनिटापर्यंत असणार आहे.
परायण वेळ - 12 ऑगस्टला सकाळी 8 वाजून 50 मिनिटं
परमा एकादशी व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि ध्यान करून भगवान विष्णूसमोर हातात अक्षदा आणि फुलं घेऊन व्रतचे संकल्पना करावी. यानंतर चौरंगावर लाल कपडा पसरवून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो पंचोपचार पद्धतीने पूजा करून नैवेद्य अर्पण करा. यानंतर भगवान विष्णूची आरती करा. शिवाय विष्णु सहस्त्रनाम पठण नक्की करा.
ॐ नमोः भगवते वासुदेवाय
ॐ नमोः नारायणाय॥
ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥ मंगलम भगवान विष्णुः, मंगलम गरुणध्वजः।
विष्णू मंत्रमंगलम भगवान विष्णुः, मंगलम गरुणध्वजः।
मंगलम पुण्डरी काक्षः, मंगलाय तनो हरिः॥
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )