Saturn Transit : वैदिक ज्योतिषास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव यांना प्रचंड महत्तव दिलं जातं. शनीदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव सर्वात मंद गतीने चालतात. शनिदेव दर अडीच वर्षांनी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.
ज्यावेळी शनिदेव आपली चाल बदलतात त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. सप्टेंबरमध्ये शनिदेव मार्गी होणार आहेत. शनीदेवाच्या या चालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. परंतु तीन राशी आहेत, ज्यांची प्रगती आणि लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची हालचाल चमत्कार घडवणार आहे. या काळात नशीब तुमच्या सोबत असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होणार आहे. पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळू शकतात. परदेशात सहलीला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा होऊ शकतो. तुमचे उत्पन्न वाढेल आणि कौटुंबिक जीवनात प्रगती होईल.
तूळ राशीचे लोकांना शनीच्या चालीचा लाभ मिळणार आहे. तूळ राशीच्या राशीच्या पाचव्या घरात शनिदेव मार्गस्थ असणार आहे. ज्यांना संतती हवी आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल. परदेश प्रवासाचीही शक्यता निर्माण होतेय. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. सेवेत असलेल्यांना पदोन्नती मिळू शकते. त्याचबरोबर कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
मकर राशीच्या लोकांनाही शनिदेव लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. पगारात चांगली वाढ होणार आहे. विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कौटुंबिक जीवनात प्रगती होईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )