Surya Grahan 2024 Effects : ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी सनातन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. ग्रहण हे सनातन धर्मात अशुभ मानलं जातं. त्यामुळे याचा सुतक काळ वैध आणि अवैध काळ पाळला जातो. या वर्षाला दोन सूर्यग्रहण आहे. पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिलला होत मात्र ते भारतात दिसलं नाही. याचा परिणाम सर्वाधिक अमेरिकेत दिसून आला. तर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे सर्वपितृ अमावस्या 2 ऑक्टोबर रोजी असणार आहे. हे सूर्य ग्रहण कन्या आणि हस्त नक्षत्रात होत असून या दिवशी सूर्यासोबत चंद्र, बुध आणि केतू स्थित असणार आहे. ते 2 ऑक्टोबरला रात्री 09:13 वाजेपासून 3 ऑक्टोबर 2024 ला पहाटे 03:17 वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या सूर्यग्रहणानुसार दुसरं सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही आहे. मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दुसरं ग्रहण हे तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात ग्रहण लावणार आहे. (Surya Grahan 2024 Second solar eclipse of this year will be seen in India these zodiac signs people will be trouble)
वर्षातील दुसरं सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करणार आहे. या लोकांची आर्थिक परिस्थिती बिडण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तणाव असणार आहे. आरोग्यही कमजोर राहणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची दाट शक्यता वर्तिवण्यात आली आहे. या काळात, तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठीही सूर्यग्रहण अशुभ ठरणार आहे. अचानक तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. सर्व बाजूंनी संकट येणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला धीर धरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका अन्यथा अडचणीत सापडला.
वर्षातील दुसरं सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांनाही त्रासदायक असणार आहे. तुम्हाला करिअरपासून आरोग्यापर्यंत समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. एखाद्या खास व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होणार आहे. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला महगात पडू शकतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)