मुंबई : जीवनमान सुधारण्याचे आणि नकारात्मकतेला दूर ठेवण्याचे मार्ग वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. यामध्ये घराच्या दिशा आणि वस्तूंचा संबंध शुभ आणि अशुभ घटनांशी जोडण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 चुकांबद्दल सांगत आहोत, ज्या अनावधानाने झाल्यामुळे वास्तुमध्ये खूप वाईट परिणाम होतात.
1. अनेकदा लोक बाथरूममध्ये कपडे धुतल्यानंतर उरलेले पाणी बादलीत पडू देतात. वास्तूनुसार असे करणे अत्यंत अशुभ आहे. बादलीत घाण पाणी ठेवल्याने आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. घरातील सुख-शांती भंग होऊ शकते.
2. आंघोळ केल्यानंतर तुम्ही कोणतेही धारदार साधन वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. आंघोळीनंतर नेल कटर, ब्लेड किंवा रेझर यासारखी तीक्ष्ण हत्यारे कधीही वापरू नयेत. असे करणे अत्यंत अशुभ ठरू शकते.
3. घराच्या बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नका. बाथरूममध्ये नेहमी पाण्याने भरलेली बादली किंवा टब ठेवा. जर त्यात पाणी नसेल तर त्या उलट ठेवा. असे केल्याने तुम्ही कोणतेही मोठे नुकसान टाळू शकता.
4. विवाहित महिलांनी आंघोळीनंतर किंवा केस धुतल्यानंतर लगेच सिंदूर भरू नये. असे केल्याने महिलांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. वाईट विचार त्यांच्या मनात जागा करू शकतात. घरातील सुख-शांती भंग होऊ शकते. कौटुंबिक वाद वाढू शकतात.
5. आंघोळ केल्यानंतर बाथरूमची लादी पूर्ण स्वच्छ करा. बाथरूमची लादी नेहमी ओली असल्यामुळे घराला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. तसेच, बाथरूम अस्वच्छ ठेवू नका आणि सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवा.