Horoscope Money Weekly (16 october to 22 october 2023) : नवरात्रीचा हा आठवडा प्रत्येक दिवस खास आहे. प्रत्येक दिवशी विशेष योगामुळे काही माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. त्यात सूर्यदेव संक्रमण करणार आहे. अशा स्थितीत करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनेक सुवर्ण संधी लाभणार आहे. या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य जाणून घ्या. (weekly money career horoscope 16 october to 22 october 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy and surya gochar and navratri 2023)
या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा लाभदायक असणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ आनंदात जाणार आहे. या आठवड्यात संयम ठेवून पुढे गेल्यास नशीब तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. जर तुम्ही परिस्थिती कुशलतेने हाताळली तर चांगले परिणाम दिसून येणार आहे. कामाच्या ठिकाणी काही मात्र वाईट बातमी कानावर पडू शकते. या आठवड्यात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष ठेवा. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती सुधारणार आहे.
शुभ दिवस: 17, 20
या राशीच्या लोकांसाठी नवरात्री हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या शुभ संधी लाभणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पाकडे जितके संयम ठेवाल तितके तुम्ही निवांत राहणार आहात. भविष्याचा विचार करून आर्थिक बाबींवर निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जीवनात आनंदच आनंद असणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास तुम्हाला फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुमचं मन प्रसन्न असेल.
शुभ दिवस: 17,18
या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल असून गुंतवणुकीतून हा काळ उत्तम असणार आहे. मनाचं ऐकल्यास तुमचं आठवडा आनंदी जाईल. मात्र या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही कुटुंबासह प्रवास करण्याचा विचार करत तो टाळणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीच्या शुभ योग जुळून आला आहे.
शुभ दिवस: 16, 20
या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा आनंद आणि समृद्धी वाढवणारा ठरणार आहे. प्रेम जीवनात आनंद दार ठोठवणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबिक बाबातीत बोलायचं झालं तर तुमच्या निर्णयावर ठाम राहा नाही, तर संकटात सापडाल. कार्यक्षेत्रात जवळची व्यक्तीपासून तुम्हाला धोका आहे. तर हा आठवडा प्रवासासाठी चांगला नाही. या आठवड्यात कागदपत्रे सांभाळून ठेवा. एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते.
शुभ दिवस: 17,19
या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. तुम्ही जितके शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय़ घ्याल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक लाभासाठी हा आठवडा माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. या आठवड्यात तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. या आठवड्यातील प्रवास टाळा. या आठवड्यात तुमचा उग्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 16,20
या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा आनंददायी असणार आहे. आर्थिक बाबींसाठी हा काळ चांगला असून तुमचे पैसांचे प्रश्न सुटणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. घरातील सदस्याकडून कानावर आनंदाची बातमी पडणार आहे. या आठवड्यात तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात महिलांना त्यांच्या प्रवासातून फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी सतत केलेले प्रयत्न तुम्हाला शेवटी यश घेऊन येणार आहे. आठवड्याच्या शेवटी थोडीशी जोखीम पत्करली तर चांगले रिझल्ट घेऊन येईल.
शुभ दिवस: 16,18,19
या राशीच्या लोकांची हा नवरात्रीचा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. समाजात मानाचे स्थान असलेल्या वडिलधाऱ्यांची साथ तुम्हाला लाभणार आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होणार असून गुंतवणुकीतून तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. मनातील आवाज तुम्हाला चांगले परिणाम देईल. कुटुंबात मात्र मतभेद होऊ शकतात. या आठवड्यात प्रवासादरम्यान भावनिक त्रास वाढण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 16,20
या राशीच्या लोकांना नवरात्रीचा हा आठवडा फायदाच फायदा घेऊन आला आहे. या आठवड्यात तुम्ही काही नवीन कौशल्ये अवगत करणार आहात. ही कला तुमच्या प्रोजेक्टसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मनाचे ऐकून निर्णय घेतल्यास तुमच्यासाठी शुभदायक ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मन धाकधूक असेल. या आठवड्यात आर्थिक बाबतीतही चांगले योग जुळून आले आहेत. या आठवड्यात केलेल्या प्रवासात यश मिळेल आणि मन प्रसन्न करणारा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटू शकतं.
शुभ दिवस: 16,19
या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात. या आठवड्यात तुम्ही केलेल्या प्रवासाचे भविष्यात लाभ होणार आहे. कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्या प्रेम जीवनात अडचणी निर्माण करणार आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीमुळे तुमची मनस्थिती बिघडणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या तुम्हाला उदास करु शकतात.
शुभ दिवस: 16,19
या राशीचे लोक आर्थिक बाबतीत या आठवड्यात प्रगती करणार आहे. प्रकल्पात मोठं यशस्वी प्राप्त होणार आहे. हा आठवड्यात तुम्हाला शुभ योग घेऊन आला आहे. कौटुंबिक निर्णय घेताना वास्तववादी असणे तुमच्या बाजूने घेणार आहे. आर्थिक बाबतीत अडचणी अचानक तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. या आठवड्यातील प्रवास पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी जीवनात अनेक सुखद अनुभव मिळणार आहे.
शुभ दिवस: 19, 20
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीतून शुभ ठरणार आहे. नवीन प्रकल्पाद्वारे तुम्हाला यश लाभणार आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली होणार असली तरी काही खर्चाबाबत तुम्ही चिंतेत असणार आहात. प्रवासात थोडी रिस्क घेतल्यास तुमच्या हिताचं ठरणार आहे. आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरणार आहे. कुटुंबातील कोणाशी अहंकाराचा संघर्षही वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आयुष्यात सुधारणा होऊ शकते.
शुभ दिवस: 19,20
या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ अनुकूल असणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने नवरात्रीत तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात दृढनिश्चयी राहिल्यास तुमचे प्रकल्प यशस्वी होण्यास मदत होईल. कुटुंबासमवेत सहलीला जाणार आहात. प्रवासादरम्यान तुम्हाला थोडं अडकल्यासारखं वाटू शकतं. आठवड्याच्या शेवटी, प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात.
शुभ दिवस: 16, 18, 20
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)