Yogini Ekadashi 2023 : आज योगिनी एकादशी! विष्णूची पूजा केल्यास तिजोरी कधीच रिकामी राहत नाही

Yogini Ekadashi 2023 : आषाढ पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात. सर्व पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तिजोरीत कायम पैसा राहण्यासाठी या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. 

Updated: Jun 14, 2023, 06:33 AM IST
Yogini Ekadashi 2023 : आज योगिनी एकादशी! विष्णूची पूजा केल्यास तिजोरी कधीच रिकामी राहत नाही title=
yogini ekadashi 2023 14 june shubh muhurat pujan vidhi importance in marathi

Yogini Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असून महिन्यात दोन एकादशी येतात. पहिली एकादशी ही कृष्ण पक्षात येते तर दुसरी ही शुक्ल पक्षात येते. आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी कधी आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात. यादिवशी विष्णूची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व पापमुक्त होतो अशी मान्यता आहे. 

योगिनी एकादशी तिथी 

एकादशी तिथी मंगळवारी 13 जूनला सकाळी 09:28 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी  14 जूनला सकाळी 08:28 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार दिवस साजरा केला जातो. त्यामुळे उदय तिथीनुसार 14 जूनला म्हणजे बुधवारी योगिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. (yogini ekadashi 2023 14 june shubh muhurat pujan vidhi importance in marathi)

योगिनी एकादशी व्रताची पूजा विधी जाणून घ्या 

सकाळी लवकर उठून स्नान करा. 
पिवळे कपडे परिधान करा. 
भगवान विष्णूसह देवघरातली सगळ्या देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. 
भगवान विष्णूला फुलं आणि तुळस अर्पण करा. 
त्यानंतर भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावावा. 
आता विष्णु सहस्रनामावलीचा पाठ करावा. 
त्याचबरोबर 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करा.
देवाला सात्त्विक वस्तू अर्पण करा. 
दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करून उपवास सोडावा. 

योगिनी एकादशी व्रताचे पारण 

योगिनी एकादशी व्रताचे पारण  15 जूनला म्हणजे गुरुवारी सकाळी 05:23 ते 08:10 या दरम्यान करता येणार आहे. त्या दिवशी द्वादशी तिथी सकाळी 8.32 पर्यंत आहे. हिंदू धर्मात उपवास नेहमी शुभ मुहूर्तावरच सोडावा असं सांगण्यात येतं. 

योगिनी एकादशी व्रताचं महत्त्व

एकादशी म्हणजे भगवान विष्णूची पूजा करण्याचा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाला येणाऱ्या योगिनी एकादशीचं व्रत केल्यास न कळत केलेल्या चुकांची क्षमा मिळते. शिवाय शास्त्रानुसार हे एक व्रत म्हणजे हजारो ब्राह्मणांना भोजन देण्याइतकं फळ देणारं आहे. त्यामुळे या एकादशी विशेष महत्त्व आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )