FIFA World Cup Final : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाने फ्रानसचा पराभव करत थरारक विजय मिळवला आहे. शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे.
फुटबॉल वर्ल्ड कपवर अखेर 36 वर्षानंतर0 अर्जेंटिनानं आपलं नाव कोरल आहे. अत्यंत चुरशीच्या फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सवर पेनल्टी शूटमध्ये 4-2 ने विजय मिळवला आहे. अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो एम्मी मार्टिनेस आणि लिओनल मेस्सी. मेस्सीनं पहिल्या हाफमध्ये एक गोल केला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनानं 2-0 ने आघाडी घेतली.
मात्र, सेकंड हाफमध्ये फ्रान्सने दोन गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानं एक्स्ट्रा टाईमध्ये मेस्सीनं आणखी एक गोल करत आघाडी घेतली. मात्र, अखेरच्या टप्प्यात फ्रान्सने एक गोल करत पुन्हा एकदा सामना 3-3 असा बरोबरीत आणला. त्यानंतर पेनल्टी शूटमध्ये मात्र अर्जेंटिनाने 4-2 ने विजय मिळवत फ्रान्सला पराभवाची धूळ चारली. तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटिनाचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न अखेर साकार झालाय. या विजयानंतर मुंबईत अर्जेंटिनाच्या फॅन्सनी जोरदार सेलिब्रेशन केलं.