IPL 2023 Auction : नुकतंच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीमचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) सगळीकडे चर्चा होती. देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने द्विशतक (Double Century) झळकावून आपलं नाणं खणखणीत बजावलं होतं. मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी ऑक्शनमध्ये खरेदीदार देखील मिळत नव्हता. अखेर एका टीमने त्याच्यावर बोली लावली.
टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेवर 50 लाखांची बोली लागली. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने अजिंक्यला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. या ऑक्शनमध्ये सर्वांचं लक्ष अजिंक्य रहाणेवर होतं. कोणती टीम अजिंक्यवर बोली लावणार याची चाहच्यांना उत्सुकता होती. अखेर चेन्नईने अजिंक्यला खरेदी केलं आहे.
Rahane is now Manjal! #SuperAuction #WhistlePodu pic.twitter.com/ol0ClDUQsx
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2022
इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. या लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व संघांना मेलद्वारे मोठी माहिती दिली आहे. BCCI ने लिलावापूर्वी अशा 5 भारतीय खेळाडूंची नावे दिली आहेत, ज्यांच्यावर IPL 2023 पूर्वी बंदी घातली जाऊ शकते. आयपीएल लिलावापूर्वी आलेल्या या बातमीने सर्व फ्रँचायझींची चिंतेत वाढ झाली आहे.
लिलावापूर्वी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत एक मोठे अपडेट दिले असून बंदी घालू शकणाऱ्या 5 खेळाडूंची नावेही नमूद केली आहेत. हे पाच खेळाडू संशयास्पद गोलंदाजीच्या वर्तुळात असून बीसीसीआय त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या सर्वांची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईचे तनुष कोटियन (Tanush Kotiya), रोहन कुनुमल (Rohan Kunumal) (केरळ), अपूर्व वानखेडे (Apoorva Wankhede) (विदर्भ), चिराग गांधी (Chirag Gandhi) (गुजरात) आणि रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh) (महाराष्ट्र) हे पाच खेळाडू आहेत.
मेगा लिलावात 405 खेळाडू मैदानात असतील. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील. 132 पैकी फक्त 30 खेळाडू सिलेक्ट होणार आहेत. लिलावात अफगाणिस्तानचा अल्लाह मोहम्मद गझनफर हा सर्वात तरूण खेळाडू असणार आहे. त्यामुळे संघ समिती तरुण खेळाडूंना संधी देणार की नाही?, असा सवाल उपस्थित होतोय.