Arjun Tendulkar Wicket : क्रिकेटचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या चांगलाच चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीच्या स्पर्धा ( Ranji Trophy ) सुरु असून अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या टीमकडून खेळतो. अर्जुनने त्याच्या खेळाने सर्वाचं लक्ष्य खेचून घेतलं आहे. डेब्यूच्या सामन्यात त्याने उत्तम खेळ करत शतक केलं. तर केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कप्रमाणे अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर बॉल टाकत झारखंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांना सोप्पं गेलं नाही. तर अर्जुनने एका यॉर्कर बॉलवर शाहबाज नदीमला थेट क्लिन बोल्ड केलंय. हा यॉर्कर बॉलला नदीमला खेळताच आला नाही.
शाहबाज नदीम फलंदाजी करत असताना अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी अर्जुनने एक यॉर्कर फेकला, जो बॉल नदीमला समजलाच नाही आणि तो विकेट गमावून बसला. विकेट मिळाल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन देखील केलं. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 3.46 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत एक विकेट घेतली.
Arjun Tendulkar wicket #Arjuntendulkar pic.twitter.com/QM3ssrCySl
— Adnan Ansari (@AdnanAn71861809) December 21, 2022
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणारी झारखंडची टीम पहिल्या डावात 386 रन्समध्ये आऊट झाली. झारखंडकडून कुमार कुशगरा याने 96 रन्सची खेळी केली, तर सौरभ तिवारीने 65 रन्स केले. गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने 68 रन्स देत 4 विकेट्स पटकावले.
गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.