आशिया कप स्पर्धेत (asia cup 2022) रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (ind vs pak) असा हाईवोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ दुबईत जोरदार सराव करत आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करताना दिसत आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू सराव सत्रादरम्यान समोरासमोर आले. यावेळी काही वेळ एकमेकांशी बोलतानाही दिसत आहेत. सराव सत्रादरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार बाबरशी झालेल्या संभाषणात रोहितने त्याला लग्न करण्याबद्दल विचारले. त्यावर बाबरने हसून 'नाही, आता नाही' असे उत्तर दिलं.
याआधी बाबरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली होती. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली पाकिस्तानी स्टारसोबत संवाद साधताना दिसत आहे.
meets #AsiaCup2022 pic.twitter.com/OgnJZpM9B1
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 27, 2022
दरम्यान,रोहित शर्माने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा केला नाही. "खेळाचा निकाल काहीही असो, भारत काही गोष्टी करून पाहणार आहे. संघाला प्लेइंग इलेव्हनचा निर्णय अजून घ्यायचा आहे," असे रोहित शर्मा म्हणाला.