लॉर्ड्सच्या मैदानावर (Lord's Cricket Ground) भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिचीच संपूर्ण जगभर चर्चा होत होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मांकडींग) केले. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (aus vs eng) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाहायला मिळाला असता. पावसामुळे हा सामना वाया गेला. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि इंग्लंडने मालिका 2-0 ने जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाचा (Australia) वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) नॉन-स्ट्रायकर एंडवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला (England captain Jos Buttler) इशारा देताना दिसत आहे. यादरम्यान स्टार्कने भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा हिचेही नाव घेतले. व्हायरल व्हिडिओमध्ये, पाचव्या षटकात जेव्हा स्टार्क चौथा चेंडू टाकत होता, तेव्हा बटलरने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली. अशा स्थितीत स्टार्कने (Mitchell Starc) त्याला असे न करण्याचा इशारा दिला. यादरम्यान, मी दीप्ती नाही, पण मी हे करू शकतो, असे स्टार्क बोलत असल्याचे स्टंप माइकमध्ये ऐकू आले.
Mitchell Starc tells England captain Jos Buttler not to leave his crease early at the non-striker’s end.#AUSvENG pic.twitter.com/27JH9E5WV1
— Nic Savage (@nic_savage1) October 14, 2022
काय म्हणाला मिचेल स्टार्क (Mitchell Starc)?
बटलरला क्रीझ सोडल्यानंतर स्टार्कने जोस बटलरला (Jos Buttler) असे करणे थांबव नाहीतर तुला बाद करेल असा इशारा दिला. बटलरने मात्र स्टार्कच्या (Mitchell Starc) दाव्याचे खंडन केले आणि त्याने क्रीज सोडली नसल्याचे सांगितले. "मी दीप्ती नाही, पण मी ते करणार नाही. याचा अर्थ असा नाही की तू आधीच क्रीझच्या बाहेर निघू शकतेस," असे स्टार्क म्हणाला. यावर, बटलरने "मला वाटत नाही की मी असं केले आहे," असे उत्तर दिले.
SOUND
What do you think about this event between Mitchell Starc and @josbuttler? #JosButtler #MitchellStarc #AUSvENG #SonySportsNetwork pic.twitter.com/rA3D5yxwFP
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) October 14, 2022
नुकतीच दीप्ती शर्मा (Deepti Sharma) नॉन-स्ट्रायकर एंडवर इंग्लंडच्या फलंदाजाला धावबाद करून खूप चर्चेत आली होती. मात्र, 1 ऑक्टोबरपासून जागतिक क्रिकेटमध्ये हा नियम लागू झाला आहे. पण जेव्हा दीप्तीने हे केले तेव्हा क्रिकेट विश्व दोन भागात विभागले गेले, एक बाजू दीप्तीच्या पाठीशी उभी राहिली, तर दुसरी बाजू हे चुकीची असल्याचे सांगत होती.