सिडनी : क्रिकेट विश्वातून खेळाडूंबाबत आनंदाच्या बातम्या येतच असतात. रविवारीच टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पंड्या वडिल झाल्याची बातमी समोर आली होती. कृणाल पंड्याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. या बातमीनंतर आता एक क्रिकेटर लग्नबंधनात अडकला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर नॅथन लायन क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. नॅथन लायनने क्रिकेटशिवाय आपली नवी इनिंग सुरू केली आहे.नॅथन लायनने गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधलीय. इन्टाग्रामवर पोस्ट टाकत याबाबत त्याने माहिती दिली.
इन्टाग्राम पोस्ट
नॅथन लायनने गर्लफ्रेंडसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरु केली आहे. रविवारी लायनने इंस्टाग्राम पोस्ट टाकत सांगितले की, त्याने मैत्रीण एम्मा मॅककार्थीसोबत लग्न केले आहे. त्याने एम्मासोबतचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामुळे ही जोडी खूपच सुंदर दिसत होती.
5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये
नॅथन लियॉन आणि एम्मा गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. शेरने अनेक प्रसंगी एम्मासोबतचे त्याचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची गेल्या वर्षीच एंगेजमेंट झाली होती आणि आता जवळपास वर्षभरानंतर त्यांनी लग्न केले आहे. रविवारी झालेल्या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्याच्या अनेक सहकाऱ्यांनीही त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर लायनचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिंगमध्ये कमाल
क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 438 विकेट्स आहेत आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये टॉप 10 मध्ये त्याचा समावेश आहे. श्रीलंका दौऱ्यावर लायनने पहिल्या कसोटीत 9 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी एकदिवसीय आणि T20I मालिका जिंकली होती. तर कसोटी मालिका अनिर्णित राहीली.