नवी दिल्ली : संपूर्ण जगभर एलजीबीटी कम्युनिटी, समलैंगिक विवाह आणि नातेसंबंधांवर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्येही या मुद्द्यावर वातावरण तापलंय. कारण ९ डिसेंबर २०१७ मध्ये या देशात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळालीय.
यानंतर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीमची तेजतर्रार बॉलर मॅगन शूटनं आपल्या गर्लफ्रेंड होल्यॉकसोबत विवाह करणार असल्याचं जाहीर केलंय. आपल्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी शूटनं आपल्या पार्टनरसोबत एक फोटोही ट्विटरवरून शेअर केलाय.
तसंच आणखी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जेसिका जोनासेननं आणि तिच्या गर्लफ्रेडंनंही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय. 'मला माझ्या आयुष्यासाठी याहून अधिक चांगला पार्टनर मिळू शकत नाही' असं म्हणत जेसिकानं आपला एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केलाय.
Could not ask for a better person to spend the rest of my life with what a night! pic.twitter.com/kPnbo1b4iz
— Jessica Jonassen (@JJonassen21) February 28, 2018