IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...

Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.

Updated: Oct 13, 2023, 06:36 PM IST
IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो... title=
Babar Azam Statement Over Support hamas

India vs Pakistan : कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आता आठव्यांदा पाकिस्तानला लोळवण्यासाठी तयार झाली आहे. वर्ल्ड कपमधील (World Cup) हायवोल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी बाबरला मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बाबर (Babar Azam) चांगलाच भडकल्याचं दिसून आलं.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात मोहम्मद रिझवानने खणखणीत शतक ठोकलं. त्याने 131 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर रिझवानने पोस्ट करत आपलं शतक हमासला समर्प्रित केलं होतं. त्यामुळे मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. रिझवानच्या याच वक्तव्यावर बाबरला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. तुम्ही क्रिकेटवर बोला ना... तुम्ही क्रिकेट सोडून दुसऱ्याच विषयावर बोलताय, असं बाबर आझमने म्हटलं आहे.

मला वाटतं भूतकाळात काय झालं ते महत्त्वाचं नाही. आपल्याला वर्तमानात जगायचं आहे. मला वाटतं की आपण चांगला खेळ करू शकतो. भारत-पाकिस्तान सामना चुरशीचा आहे. चाहते मोठ्या संख्येने येत आहेत. मला वाटतं की आम्हाला चाहत्यांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. आम्ही त्यानुसार नियोजन करू कारण पहिल्या 10 षटकात विकेट वेगळी असते आणि 10 षटकांनंतर वेगळी असते. त्यामुळे त्यानुसार नियोजन करावे लागेल, असं वक्तव्य बाबर आझम याने केलं आहे.

आणखी वाचा - 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...', IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमनची कानउघडणी!

पाकिस्तानचा संघ : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.