भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसलाय. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलीय. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली होती. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आलंय. त्यावर आता कुस्तीपटू बजरंग पुनियाने पोस्ट केली आहे.
विनेश तू हिंमत आणि नैतिकतेमध्ये सुवर्णपदक विजेती आहे. तु भारताची मुलगी आहेस आणि हे मेडलही देशाचंच आहे. काल ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी वजन केलं तेव्हा ते बरोबर होतं. आज सकाळी जे घडलं त्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही, असं बजरंग पुनिया म्हणाला आहे. संपूर्ण देशाला अश्रू आवरता येत नाहीत. सर्व देशांची ऑलिम्पिक पदकं एका बाजूला आणि तुझं पदक दुसऱ्या बाजूला, असं बजरंग पुनियाने म्हटलं आहे.
प्रत्येक माणूस आज तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. जगातील प्रत्येक महिलेला हे पदक आपलं स्वत:चं पदक असल्यासारखं वाटत होतं.मला आशा आहे की ऑलिम्पिक खेळणाऱ्या जगातील सर्व महिला कुस्तीपटू विनेशच्या पाठीशी एकजुटीने उभे राहतील. सर्व महिलांचा आवाज आज योग्य ठिकाणी पोहोचावा, अशी इच्छा देखील बजरंग पुनियाने व्यक्त केली आहे.
विनेश तुम हिम्मत और नैतिकता की गोल्ड मेडलिस्ट होमाटी की बेटी हो इसलिए ये मेडल भी माटी का है. बहुत हौसले से लड़ी हो. कल जब खेलने से पहले ओलंपिक ऑफिशियल्स ने आपका वजन लिया तो आपका वजन एकदम परफेक्ट था.
आज सुबह जो हुआ उसपर कोई यकीन नहीं करना चाहता.
100 ग्राम. यकीन ही नहीं…
— Bajrang Punia (@BajrangPunia) August 7, 2024
दरम्यान, फायनलआधी वजन जास्त भरल्यानं महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात तिला अपात्र ठरवण्यात आलंय. ती फायनलमध्ये भाग घेऊ शकणार नाही आणि तिला पदकसुद्धा मिळणार नाही. ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक अमेरिकेच्या कुस्तीपट्टूला मिळेल. तर कांस्यपदकासाठी सामना होईल. याबाबत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननेसुद्धा माहिती दिलीय.