Rohit Sharma: ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने तिन्ही फॉर्मेटसाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. टीमची घोषणा होण्यापूर्वी टी-20 च्या कर्णधारपदासाठी रोहित शर्माची मनधरणी करणार असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धही सूर्यकुमार यादव टीमचं नेतृत्व करणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सिरीज महत्त्वाची मानली जातेय.
टी-20 वर्ल्ड कपसाठी आता काही सामने उरले आहेत. अशातच टी-20 च्या टीमचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजमध्ये कर्णधार कोण असेल, तोच टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताचा चेहरा असेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु यावेळी बीसीसीआयने अवघ्या दोन ओळींमध्ये सर्वकाही स्पष्ट केलं.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्याला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची 30 तारखेला घोषणा करण्यात आली. यावेळी बीसीसीआयने टीमच्या घोषणेसोबत एक मेसेज देखील लिहिला. या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलंय की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी व्हाईट बॉल फॉर्मेटमधून ब्रेक घेण्याची विनंती केली. तर मोहम्मद शमी सध्या मेडिकल कंडीशनमुळे खेळू शकणार नाही.
दिसण्यासाठी ही साधी माहिती वाटतेय. मात्र बीसीसीआयला हवं असतं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये निवड न करण्याबाबत कोणतंही विधान जारी केलं नसतं. परंतु या पोस्टमुळे असं स्पष्ट झालंय की, बोर्ड अजूनही रोहित-विराटला टी-20 मध्ये समावेश करू इच्छितात.
टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या 5 सामन्यांच्या T20 सिरीजमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरूद्धही तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये कर्णधार असेल. तर तीन सामन्यांच्या वनडे सिरीजचीची कमान लोकेश राहुलकडे असणार आहे.
कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसिद्ध कृष्णा.
टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ:
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सुंदर , रवी बिश्नोई, कुलदीप यादव,अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
वनडेसाठी भारताचा संघ:
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.