मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर आता टीम इंडियाच्या (Team India) मालिकांना पुन्हा श्रीगणेशा होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडियाविरुद्ध 5 मॅचची टी 20 सीरिज खेळणार आहे. या मालिकेत मुख्य खेळाडूंना विश्रांती देत युवांना संधी देण्यात आली आहे. मात्र आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुनही निवड समितीने 3 खेळाडूंकडे दुर्लक्ष केलंय. (bcci not give chance to shikhar dhawan sanju samson and mukesh choudhary against to south africa t20i series)
शिखर धवनने आयपीएलच्या 15 व्या हंगामात चांगली कामगिरी केली. धवनने 14 सामन्यांमध्ये 460 धावा केल्या. धवनला आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र धवनला संघातही स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
संजू सॅमसनने आपल्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहचवलं. राजस्थानचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न थोडक्यासाठी हुकलं. मात्र संजूने पूर्ण हंगामात विकेटकीपिंग, बॅटिंग आणि कॅप्ट्न्सी या तिन्ही जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या. संजूने 17 सामन्यात 458 धावा केल्या.
त्यामुळे निवड समिती संजूला संधी देईल, असं जवळपास निश्चित झालं होतं. मात्र निवड समितीने अखेर संजूलाही डच्चूच दिला.
आयपीएलच्या 15 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सने निराशाजनक कामगिरी केली. मात्र मुकेश चौधरीने आपली छाप सोडली. मुकेशने 13 सामन्यात 16 विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. इतकंच काय कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनेही मुकेशचं कौतुक केलं. पण दुर्देवाने मुकेशलाही निवड समितीने डच्चूच दिला.
टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.
टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.