IPL 2022 Bio-Bubble Rules : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जेव्हा बायो-बबल कठोर असेल असे म्हणते. याचा अर्थ खेळाडूंना ते नक्कीच गांभीर्याने घ्यावं लागणार आहे. बायो बबलचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई होणार आहे. खेळाडूला संपूर्ण हंगामासाठी बंदी देखील घातली जाऊ शकते. बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही नियम कडक केले आहेत. नियमाचं उल्लंघन झाल्यास तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.
बीसीसीआयने गेल्या वर्षी केलेल्या चुकांमधून धडा घेतल्याचे दिसते आहे. आयपीएल 2021 हे तीन संघांमध्ये बायो-बबलचे उल्लंघन झाल्यामुळे निलंबित करावे लागले होते. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून बीसीसीआयने आता खबरदारी घेतली आहे. यासाठी पॉइंट डॉकिंग, खेळाडूंवर बंदी आणि फ्रँचायझींना मोठा दंड लागू केला आहे.
BCCI ने म्हटले आहे की,
'COVID-19 साथीच्या रोगामुळे व्यक्तींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने या ऑपरेशनल नियमांच्या अधीन राहून सहकार्य, वचनबद्धता आणि सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.'
खेळाडू/अधिकारी/सामना अधिकारी यांच्याकडून बायो-बबलचे उल्लंघन झाल्यास
१. प्रथमच गुन्हेगार आढळल्यास खेळाडू, सामना अधिकारी/ फ्रँचायझी अधिकारी यांना 7 दिवस अनिवार्य क्वारंटाईन.
२. खेळाडु/सामना अधिकारी यांना न खेळलेल्या सामन्यांसाठी पैसे दिले जाणार नाहीत.
३. दुस-यांदा दोषी आढळल्यास एका सामन्याचे निलंबन केले जाईल.
४. तिसर्यांदा दोषी आढळल्यास, खेळाडू/अधिकारीला IPL बायो-बबलमधून काढून टाकले जाईल.
५. त्यांच्यावर आयपीएल 2022 पासून बंदी घातली जाईल आणि कोणत्याही बदली खेळाडूला बोलावता येणार नाही.
कोविड चाचणी चुकवल्यास : प्रथमच त्याला इशारा दिला जाईल. दुसऱ्यांदा, सदस्याला प्रति गुन्ह्यासाठी 75,000 रुपये दंड आकारला जाईल आणि त्यांना स्टेडियम किंवा प्रशिक्षण सुविधेत प्रवेश दिला जाणार नाही.
कुटुंबातील सदस्यांकडून बायो-बबलचे उल्लंघन झाल्यास
प्रथमच गुन्हा झाल्यास, कुटुंबातील सदस्याला 7 दिवस क्वारंटाईन करणार
संबंधित खेळाडूला अनिवार्य 7-दिवसांचा री-क्वारंटाइन कालावधी देखील पूर्ण करावा लागेल आणि चुकलेल्या सामन्यांसाठी पैसे दिले जाणार नाहीत.
दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास, कुटुंबातील सदस्याला IPL च्या बायो-बबलमधून कायमचे काढून टाकले जाईल.
फ्रँचायझींवर निर्बंध
१. संबंधित फ्रँचायझीला देखील खेळाडूसोबत शिक्षा केली जाईल. फ्रँचायझीला प्रथमच गुन्हा केल्यास १ कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. दुसऱ्यांदा गुन्ह्यासाठी, फ्रँचायझीकडून 1 पॉइंट आणि २. तिसऱ्यांदा गुन्ह्यासाठी 2 पॉइंट वजा केले जातील.
३. फ्रँचायझी किमान १२ खेळाडू (एका पर्यायी क्षेत्ररक्षकासह) मैदानात उतरवू शकत नसल्यास, त्यांना आयपीएल तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल.
४. आयपीएल टीसी मॅच पुन्हा शेड्युल करण्याचा प्रयत्न करेल पण जर ते शक्य झाले नाही, तर फ्रँचायझीला मॅच गमवावी लागेल.
५. जर एखादा खेळाडू आरोग्य आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना न सांगता बाहेर पडला तर फ्रँचायझीला मोठा दंड भरावा लागेल.
६. फ्रँचायझीला प्रो-रेटा आधारावर दंड देखील भरावा लागेल जो खेळाडूला सामने चुकवल्याबद्दल दिला गेला असेल.