Cheteshwar Pujara चा मोठा निर्णय; भारताकडून संधी न मिळाल्याने आता 'या' विदेशी टीमकडून खेळणार

India vs South Africa Test: चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara ) वर्ल्ड चॅम्पियनशिपचा फायनल सामना हा शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याला संधी देण्यात न आल्याने त्याने विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 14, 2023, 09:08 AM IST
Cheteshwar Pujara चा मोठा निर्णय; भारताकडून संधी न मिळाल्याने आता 'या' विदेशी टीमकडून खेळणार title=

India vs South Africa Test: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी टी-20 आणि वनडे सिरीजनंतर टीम इंडियाला टेस्ट सिरीज देखील खेळायची आहे. नुकतंच टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara ) संधी देण्यात आलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यानंतर पुजारा ( Cheteshwar Pujara ) टीम इंडियाकडून खेळलेला नाही. अशातच आता पुजाराने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara ) वर्ल्ड चॅम्पियनशिपचा फायनल सामना हा शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याला संधी देण्यात न आल्याने त्याने विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आता पुजाराने इंग्लंडमधून काऊंटी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

तिसऱ्या सिझनमध्ये 'या' टीमकडून खेळणार पुजारा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्राचं नेतृत्व करणारा पुजारा ( Cheteshwar Pujara ) इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. तो सलग तिसऱ्या सिझनमध्ये ससेक्स क्लबकडून खेळताना दिसणार आहे. पुजाराने 2024 च्या काउंटी सिझनसाठी इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट क्लब ससेक्सशी पुन्हा करार केला आहे. 2022 मध्ये पुजाराने ( Cheteshwar Pujara ) पहिल्यांदा ससेक्सकडून सामना खेळला होता. त्यानंतर आता पुजारा पुन्हा 2024 च्या सिझनमधीन काउंटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या 7 सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

काऊंटीमध्ये कशी आहे पुजाराची कामगिरी?

ससेक्स टीमकडून पुजाराची ( Cheteshwar Pujara ) कामगिरी उत्कृष्ट आहे. या क्लबसाठी, त्याने काउंटी चॅम्पियनशिपच्या 18 सामन्यांमध्ये 64.24 च्या सरासरीने 1863 रन्स केल्या आहेत. याशिवाय यामध्ये 8 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंत नाही तर पहिल्या सत्रात डर्बीशायरविरुद्ध केलेल्या 231 रन्स हा त्याची सर्वोच्च स्कोर होता.

पुन्हा एकदा ससेक्ससोबत जोडला गेल्यानंतर पुजारा ( Cheteshwar Pujara ) म्हणाला, मी गेल्या दोन सिझनमध्ये माझ्या खेळाचा खूप आनंद घेतला. मी पुन्हा ससेक्सच्या टीममध्ये सामील होत आहे याचा खूप आनंद आहे. मी टीममध्ये सामील होण्यासाठी उत्साहित आहे