आले तुफान किती जिद्द ना सोडली! बंगळुरु कसोटीत ऋषभ पंतचा महापराक्रम, एमएस धोनीचा विक्रम मोडला

Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार कमबॅक केला आहे. कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर गारद झाली. पण दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर 

राजीव कासले | Updated: Oct 19, 2024, 03:50 PM IST
आले तुफान किती जिद्द ना सोडली! बंगळुरु कसोटीत ऋषभ पंतचा महापराक्रम, एमएस धोनीचा विक्रम मोडला title=

Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केला आहे. पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार कामगिरी करत 400 धावांचा टप्पा करत न्यूझीलंड संघावर आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिल्या डावात 402 धावांचा डोंगर उभा करत तब्बल 356 धावांची आघाडी घएतली. पण भारतीय फलंदाजांनी न डगमगता दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सर्फराज खान आणि ऋषभ पंतने शतकी भागिदारी करत जिद्द सोडली नसल्याचं दाखवून दिलं. 

सर्फराज-पंतची शतकी भागिदारी
दुसऱ्या डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 52 धावा आणि विराट कोहलीने 70 धावा कर संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर युवा फलंदाज सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी खेळपट्टीवर तळ ठोकला. पंत आणि सर्फराजने चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत बंगळुरु सामन्यात दमदार कमबॅक केलं. सर्फराज आणि पंतने 202 धावांची भागिदारी केली. सर्फराज खान 150 धावांवर बाद झाला. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातलं पंतचे हे पहिलं शतक ठरलं.

पंतच्या नावार मोठा विक्रम
ऋषभ पंतचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. पंत 99 धावांवर बाद झाला. पंतने अवघ्या 105 चेंडूत पाच सिक्स आणि नऊ चौकार लगावत 99 धाा केल्या. पंत शतकाच्याबाबतीत दुर्देवी ठरला असला तरी आपल्या या खेळीत पंतने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 2500 धावा करणारा तो पहिला भारतीय विकेटकिपर बनला आहे. अवघ्या 62 डावात पंतने हा महापराक्रम केला आहे. याआधी हा विक्रम टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. धोनीने 69 डावात अडीच हजार धावांचा टप्पा केला होता. 

विकेटकिपिंग करताना ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला विकेटकिपिंग करता आली नाही. पण एक दिवस आराम केल्यानंतर चौथ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरलेल्या पंतने कमाल करत चांगली फलंदाजी करण्याबरोबरच टीम इंडियाला संकटातूनही बाहेर काढलं

कमी डावात 2500 धावा करणारे भारतीय विकेटकिपर
62  इनिंग - ऋषभ पंत
69 इनिंग - महेंद्र सिंह धोनी
82 इनिंग - फारुख इंजीनियर

पंतने केली फारुख इंजिनिअरच्या विक्रमाची बरोबरी
पंतने आपल्या अर्धशतकी खेळीत आणखी एक विक्रमाची नोंद केली. पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा संयुक्त रित्या दुसरा भारतीय विकेटकिपर ठरलाय. पंतने कसोटी कारकिर्दीत 18 व्यांदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. पंतने 62 इनिंगमध्ये ही कामगिरी केली आहे. याबाबाबती पंतने फारुख इंजिनिअर यांची बरोबरी केली आहे. तर धोनी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 50+ धावा करणारे भारतीय विकेटकिपर

39 - महेंद्र सिंह धोनी (144 इनिंग)
18 - फारुख इंजीनियर (87 इनिंग)
18 - ऋषभ पंत (62 इनिंग)
14 - सयद किरमानी (124 इनिंग).