मुंबई : अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात गुलाबी बॉलने टेस्ट सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) जय शाह यांनी गुरुवारी म्हटलं की, नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह गुलाबी बॉलने टेस्ट सामन्यांचे आयोजन केले जाईल. या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड भारत दौर्यावर येणार आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होईल. मंडळाने या दौर्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोटेरा हे दोन्ही देशांमधील डे नाईट टेस्ट मॅचचे आयोजन करणार असल्याची माहिती दिली होती.
अहमदाबाद गुलाबी बॉलने टेस्ट सामने खेळले जाणार आहे. टेस्ट सीरीज ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आणि डे-नाईट टेस्ट २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळली जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय टीम भारतात परतेल. बीसीसीआयने आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०२० मधील वनडे वर्ल्डकपवर आधारित वनडे आणि टी-२० मालिकेसाठी योजना आखली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अंतर्गत कर्णधार विराट कोहलीची टीम पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपची तयारी करेल.