IPL 2019 एलिमीनेटर | पंतचा दणका, दिल्लीची हैदराबादवर २ विकेटने मात

हैदराबादने दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान दिले होते. 

Updated: May 8, 2019, 11:52 PM IST
IPL 2019 एलिमीनेटर | पंतचा दणका, दिल्लीची हैदराबादवर २ विकेटने मात title=

विशाखापट्टणम : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्लीने हैदराबादचा २ विकेटने पराभव केला आहे. पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने एलिमीनेटर सामना जिंकला आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतने ताबडतोड खेळी केली. त्याने २१ बॉलमध्ये ४९ रन कुटल्या. दिल्लीने विकेट गमावल्यानंतर पंतने एकाकी खिंड लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. पंतचे दिल्लीच्या विजयात महत्वाचे योगदान राहिले. दिल्लीकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक ५६ धावा केल्या.

 

दिल्लीचा विजय झाल्याने चेन्नई आणि दिल्ली यांच्यात क्वालिफायर-२ चा सामना खेळला जाईल. हा सामना १० मे ला खेळण्यात येणार आहे.  हैदराबादने दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीने १ बॉल आधी पूर्ण केले. दिल्लीने  १९. ५ ओव्हरमध्ये १६५ रन केल्या.

विजयी आव्हानाचे पाठलाग करताना दिल्लीची शानदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने आपल्या टीमला अपेक्षित अशी सुरुवात मिळवून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ६६ रनची पार्टनरशीप झाली. ही जोडी तोडायला दिपक हुड्डाला यश आले. त्याने शिखर धवनला ऋद्धीमान साहाच्या हाती स्टंपिग केले. धवन १७ रन करुन माघारी परतला. 

धवननंतर कॅप्टन श्रेयस अय्यर मैदानात आला. यादरम्यान पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले. पृथ्वीचे आयपीएलमधील हे ४ थे अर्धशतक ठरले.

पृथ्वी-श्रेयस अय्यरमध्ये पार्टनरशीप होण्याआधीच ही जोडी खलील अहमद मोडून काढली. खलील अहमदने ११ व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर श्रेयस अय्यरला आऊट केले. श्रेयस अय्यरनंतर ऋषभ पंत मैदानात आला. खलील अहमदने ११ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पृथ्वीला माघारी पाठवले. फटका मारण्याच्या नादाच पृथ्वीने आपली विकेट टाकली. 

एकाच ओव्हरमध्ये २ विकेट गेल्याने दिल्लीवर दबाव निर्माण झाल्याचे वाटत होते. पंरतु मैदानात असलेल्या  ऋषभ पंत-कुलीन मुनरोने संधी मिळाल्यावर मोठे फटके मारत टीमचा स्कोअरबोर्ड धावता ठेवला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 24 रन जोडल्या. हैदराबादचा स्कोअर १११ असताना कुलीन मुनरो १४ रन करुन तंबूत परतला. त्याला राशीद खानने एलबीडबल्यू केले. रशीदने त्याच ओव्हरमध्ये अक्षर पटेलला देखील माघारी पाठवले. अक्षर पटेलला भोपळा देखील फोडता आला नाही.

दिल्लीने खलील अहमद आणि राशीद खानच्या यांच्या एकाच ओव्हरमध्ये प्रत्येकी २ विकेट गमावले. त्यामुळे थोड्या प्रमाणात दबाव आला होता. परंतु दिल्लीचे विकेट जात असताना ऋषभ पंत सावधपणे खेळत होता. दिल्लीला अवघ्या काही धावांची गरज असताना  पंत आऊट झाला. पंत आऊट झाल्याने हैदराबादचे मॅचमध्ये पुनरागमन झाले. पंरतु  केमो पॉलने मारलेल्या शॉटमुळे दिल्लीचा विजय झाला.

हैदराबादकडून भूवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि  राशिद खान या तिघांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले. तर दीपक हुड्डाने १ विकेट मिळवला. 

याआधी दिल्लीने टॉस जिंकून हैृदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडले. हैदराबादने २० ओव्हमध्ये ८ विकेट गमावून १६२ रन केल्या. हैदराबादकडून मार्टिन गुप्टीलने तडाखेदार १९ बॉलमध्ये  ३६ रनची खेळी केली. तर मनिष पांडे, विजय शंकर, केन विलियमसन मोहम्मद नबीने देखील २० पेक्षा अधिक रन करत चांगली साथ दिली. दिल्लीकडून किमो पॉलने ३ विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने २ आणि ट्रेंट बोल्ट आणि अमित मिश्राने १-१ विकेट घेतली.